Amitabh Bachchan : विवाहित असतानाही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं अमिताभ बच्चन यांच्या लेकीचं अफेअर!

Amitabh Bachchan | लग्नानंतर 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता! अनेक ठिकाणी करण्यात आलंय स्पॉट... श्वेता बच्चन हिच्या पतीचं नाव निखील नंदा असून ते प्रसिद्ध उद्योजक आहेत... बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतं चर्चेत...

Amitabh Bachchan : विवाहित असतानाही 'या' अभिनेत्यासोबत होतं अमिताभ बच्चन यांच्या लेकीचं अफेअर!
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 11:53 AM

महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगत असते. बॉलिवूडचं प्रतिष्ठित कुटुंब असल्यामुळे बच्चन कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन-नंदा देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. श्वेता बच्चन हिचं लग्न उद्योजक निखील नंदा यांच्यासोबत झालं आहे. श्वेता कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. आता श्वेता तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.

सांगायचं झालं तर, श्वेता बच्चन – नंदा आणि निखील नंदा एकत्र राहात नाही. कामामुळे दोघे वेगळे राहातात असं अनेकदा सांगण्यात आलं आहे. एक काळ असा होता जेव्हा लग्नानंतर श्वेता मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. निखील नंदा आणि श्वेता बच्चन विभक्त झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता – निखील यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे घटस्फोट होऊ शकलं नाही… असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. जेव्हा श्वेता मुंबईत शिफ्ट झाली, तेव्हा तिच्या नावाची चर्चा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत होऊ लागली.

हे सुद्धा वाचा

ज्या अभिनेत्यासोबत श्वेता हिच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता हृतिक रोशन होता. सांगायचं झालं तर, श्वेता आणि हृतिक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. शाळेत देखील दोघे एकत्र होते. जेव्हा हृतिक यांच्या पायाला दुखापत झाली होती, तेव्हा श्वेता आणि अभिषेक त्याला भेटायला देखील जायचे.

रिपोर्टनुसार, कुणाल कपूर याच्या लग्नात श्वेता आणि हृतिक एकमेकांच्या आणखी जवळ आले. दोघांना अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाहीतर, श्वेता बच्चन हिच्यामुळेच हृतिक आणि अभिनेत्री कंगना रनौत यांचं ब्रेकअप झाल्याचा देखील दावा करण्यात येतो.

कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगू लागल्या तेव्हा श्वेता हिने स्वतः प्रकरणातून स्वतःला लांब करण्याचा निर्णय घेतला. हृतिक रोशन देखील कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता सबा आझाद हिला डेट केलं आहे.

सुझान खान हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर हृतिक याच्या आयुष्यात सबा हिची एन्ट्री झाली. दोन मुलांच्या जन्मानंतर आणि लग्नाच्या 19 वर्षांनंतर हृतिक आणि सुझान यांनी घटस्फोट घेतला. दोघांच्या घटस्फोटाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.