अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज करताच अशी होती अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांनी खुद्द हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. अभिषेकने 'गुरू' या चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर बिग बींना फोन करून प्रपोजलविषयी माहिती दिली होती. त्यानंतर बिग बी दोघांना सोबत घेऊन घरी निघाले होते.

अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज करताच अशी होती अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 10:41 AM

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र या चर्चांवर अद्याप दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच जेव्हा अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, तेव्हा त्यावर अमिताभ बच्चन यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. न्यूयॉर्कमध्ये ‘गुरू’ या चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर अभिषेकने बिग बींना फोन केला होता. ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केल्याची बातमी अभिषेकने फोन करून बिग बींना कळवली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन हे अभिषेक आणि होणाऱ्या सुनेला काय म्हणाले, याचा खुलासा खुद्द त्यांनीच एका मुलाखतीत केला होता.

ते म्हणाले, “अभिषेक आणि ऐश्वर्या एकमेकांना पसंत करतात. न्यूयॉर्कमध्ये ‘गुरू’ या चित्रपटाच्या प्रीमिअरनंतर अभिषेकने मला फोन केला आणि सांगितलं की त्याने ऐश्वर्याला प्रपोज केलंय. मी त्याला म्हणालो, घरी ये. मी ऐश्वर्यालाही विचारलं की ती खुश आहे का? ती हो म्हणाली. मी दोघांना सोबत घेऊन घरी परतलो. मी तिला म्हणालो की आता हे तुझंही घर आहे. बाकी कोणत्याही गोष्टीने आम्हाला काय फरक पडणार आहे?”

हे सुद्धा वाचा

‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि ‘कुछ ना कहो’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. मात्र ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी 20 एप्रिल 2007 रोजी धूमधडाक्यात लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगा आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला दोघं वेगवेगळे आल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. यावेळी अभिषेक संपूर्ण बच्चन कुटुंबीयांसोबत आला होता. तर ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या दोघी वेगळ्या आल्या होत्या. या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशीही जोडलं जातंय.

ऐश्वर्याने 1 नोव्हेंबर रोजी तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्त असंख्य चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या सर्वांत ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन आणि सासरे अमिताभ बच्चन यांनी तिच्यासाठी सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. फक्त बिग बी आणि अभिषेकच नाही तर बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनीही ऐश्वर्यासाठी पोस्ट लिहिली नव्हती. यामुळे तिच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.