स्टॉक मार्केटबद्दल नव्याचं मोठं वक्तव्य, कोट्यवधींचा बिझनेस सांभाळते अमिताभ बच्चन यांची नात
बॉलिवूडचे महानाक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... आता देखील नव्या तिच्या व्यवसायामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 21 व्या वर्षी बिग बींची नात कोट्यवधींचा बिझनेस सांभाळते... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या हिची चर्चा...
मुंबई | 8 मार्च 2024 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण अता बिग बी स्वतःमुळे नाहीतर, नात नव्या नवेली नंदा हिच्यामुळे चर्चेत आले आहेत. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन नंदा हिची लेक नव्या नंदा वयाच्या 21 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचा बिझनेस सांभाळते. नव्या हिला स्टॉक मार्केटबद्दल देखील अनेक गोष्टी माहिती आहेत. नुकताच नव्या हिने स्टॉक मार्केट आणि श्रीमंतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या हिची चर्चा रंगली आहे.
आजी – आजोबा दिग्गज कलाकार असूनही नव्या हिने अभिनयाचा मार्ग न स्वीकारता व्यवसायाकडे स्वतःचा मोर्चा वळवला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नव्या हिने तिच्या व्यवसायाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नव्या म्हणाली, ‘मला सुरुवातीपासून वडीलांकडून व्यवसाय शिकण्यात रस होता…’
‘आईकडंच कुटुंब आई वडिलांचं कुटुंब दोन्ही कुटुंब श्रीमंत आहेत. वडिलांकडे पाहिलं तर, गेल्या चार पिढ्या व्यवसायात आहेत. व्यवसायात मी स्वतःला यशाच्या शिखरावर जाताना पाहाते म्हणून मला व्यवसायात रस आहे. वयाच्या 21 व्या वर्षापासून मी व्यवसाय सांभाळत आहे.’
‘वडील आणि आजोबांनी मला व्यवसायातील अनेक छोट्या – मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्यासोबत बसून मी तासोंतास स्टॉक मार्केटवर चर्चा करते. मला व्यवसाय करायला आवडतो म्हणून मी व्यवसाय करते…’ असं देखील नव्या नवेली नंदा म्हणाली.
सांगायचं झालं तर, सेलिब्रिटींची मुलं करियरची सुरुवात बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन करतात. आतापर्यंत अनेक स्टारकिड्सने आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पण नव्या हिने कधीच अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला नाही.
नव्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. नव्या गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. नव्या अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
अनेक ठिकाणी सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.