Amitabh Bachchan Health : ‘श्वास घेण्यासाठी देखील त्रास…’ अपघातानंतर बिग बींची प्रतिक्रिया

अपघातानंतर बिग बी कधी पूर्ण बरे होतील आणि जलसामधून चाहत्यांना स्वतःची एक झलक दाखवतील या प्रतीक्षेत त्यांचे असंख्य चाहते... गंभीर घटनेनंतर देखील अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना असा दिला दिलासा...

Amitabh Bachchan Health : 'श्वास घेण्यासाठी देखील त्रास...' अपघातानंतर बिग बींची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:28 AM

Amitabh Bachchan Health : महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच शुटिंग दरम्यान अपघात झाल्याचे माहिती दिली आहे. बिग बींनी एका ब्लॉगच्या माध्यमातून घडलेल्या गंभीर घटनेबद्दल सांगितलं आहे. अपघात झाल्यानंतर होत असलेल्या वेदनांबद्दल देखील बिग बींनी त्यांच्या चाहत्यांना सांगितलं आहे. ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन म्हणाले, ‘अपघातानंतर प्रचंड त्रास झाला. हलण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत होता… पण आता काळजी करण्याचं काही कारण नाही…’ असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी जगभरातील चाहत्यांना दिलासा दिला आहे. बिग बींच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

अपघातानंतर बिग बी कधी पूर्ण बरे होतील आणि जलसामधून चाहत्यांना स्वतःची एक झलक दाखवतील या प्रतीक्षेत त्यांचे असंख्य चाहते आहेत. सध्या सर्वत्र बिग बींच्या अपघआताची चर्चा तुफान रगंत आहे. ब्लॉगमध्ये स्वतःच्या प्रकृतीबद्दल सांगताना बिग बी म्हणाले, ‘सध्या जलसा याठिकाणी आराम करत आहे. प्रकृती ठिक होण्यासाठी काही आठवडे लागतील….’ हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे.

पुढे बिग बी म्हणाले, ‘वेदना होत असल्यामुळे डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. त्यामुळे जी कामे आहेत, ती काही दिवसांसाठी थांबवण्यात आली आहेत. मी आता जलसामध्ये आराम करत आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच चालत आहे…’ अनेक वर्ष सिनेमांच्या माध्यामातून चाहत्यांच्या मनार राज्य करणाऱ्या बिग बी साता समुद्रापार देखील प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं सांगितलं आहे.

याआधी देखील सिनेमाचं शुटिंग करत असताना बिग बी यांचा अपघात झाला आहे. २६ जुलै १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान बिग बी यांचा अपघाता झाला होता. सिनेमातील एका सीनमध्ये जेव्हा मार्शल आर्टमध्ये तरबेज असलेले पुनीत इस्सर यांनी बिग बींना मारलं होतं. सिनेमासाठी जेव्हा पुनीत इस्सर यांनी बिग बींच्या पोटात जोरात मारलं तेव्हा अमिताभ बच्चन खाली जमीनीवर पडले.

‘कुली’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झालेल्या या घटनेनंतर मनमोहन देसाई यांनी तात्काळ अमिताभ बच्चन यांना हॉटेलमध्ये पाठवलं. त्यानंतर डॉक्टरांची टीम देखील बिग बींच्या हॉटेल रुममध्ये पोहोचली. बराच वेळ डॉक्टरांना काय झालं आहे कळालं नाही. सतत अनेक चाचण्याकरुन देखील निदान स्पष्ट होत नव्हतं. अमिताभ यांची प्रकृती खालावत होती.

त्यानंतर डॉ. भट्ट यांनी एक्स-रे अहवालात आतड्यात छिद्र असल्याचं सांगितलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर २ ऑगस्ट १९८२ मध्ये अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर जेव्हा बिग बीची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांना दिलासा मिळाला.

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.