‘मी राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला जाणार नाही’; बिग बी असं का म्हणाले?

राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला जाण्यास अमिताभ बच्चन यांचा नकार; कारण आलं समोर

'मी राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला जाणार नाही'; बिग बी असं का म्हणाले?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 6:38 PM

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगद्वारे राकेश कुमार यांच्यासाठी भावना व्यक्त केल्या आहेत. राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला न जाण्यामागचं कारणसुद्धा त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे.

‘आणखी एक दु:खाचा दिवस. आणखी एक सहकारी आपल्याला, खासकरून मला सोडून गेला. राकेश यांनी ‘जंजीर’साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून, प्रकाश मेहरा यांच्या इतर चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं. हेरा फेरी, खून पसीना, मिस्टर नटवरलाल, याराना यांसारखे चित्रपट त्यांनी इंडस्ट्रीला दिले. सेटवर आणि इतर कार्यक्रमांमध्ये, होळीच्या जल्लोषात ते आनंदाने सहभागी व्हायचे’, अशा शब्दांत बिग बींनी आठवणी सांगितल्या.

‘एकानंतर एक सर्वजण सोडून गेले. मात्र राकेश कुमार यांच्यासारखे लोक आपली छाप सोडून जातात, त्याला मिटवणं कठीण असतं. स्क्रीनप्ले आणि दिग्दर्शनाचं त्यांचं ज्ञान अफाट होतं. त्यांच्या त्यांच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास होता. आपल्या सहकलाकारांच्या कोणत्याही दु:खात ते खंबीरपणे साथ द्यायचे. त्यांची मदत करण्यासाठी तत्पर असायचे’, असं त्यांनी पुढे लिहिलं.

हे सुद्धा वाचा

राकेश कुमार यांच्या अंत्यविधीला न जाण्यामागचं कारण सांगताना त्यांनी लिहिलं, ‘मी त्यांच्या अंत्यविधीला जाणार नाही. कारण राकेश यांना मी अशा परिस्थितीत बघू शकत नाही. राकेश यांनी त्यांच्या कल्पनांनी आणि चित्रपटांनी आमच्यासारख्यांना मोठं केलं. त्यांची खूप आठवण येईल.’

राकेश कुमार यांचं 10 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.