AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेक्षकांच्या भेटीला येतंय ‘कौन बनेगा करोडपती’चं 13वं पर्व, तुम्ही देखील होऊ शकता सहभागी!

बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देशातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.

प्रेक्षकांच्या भेटीला येतंय ‘कौन बनेगा करोडपती’चं 13वं पर्व, तुम्ही देखील होऊ शकता सहभागी!
कौन बनेगा करोडपती 13
| Edited By: | Updated on: May 06, 2021 | 10:13 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देशातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सोनी टीव्हीने (Sony Tv) नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, ‘अमिताभ बच्चन प्रेक्षकांना सांगत आहेत की तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांमध्ये किती अंतर आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त तीन अक्षरे, प्रयत्न करा. तर, आपली स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी फोन उचलून तयार व्हा, कारण केबीसी 13ची  (KBC 13) नोंदणी 10 मे पासून सुरू होत आहे.’(Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati  season 13 announcement)

केबीसी 12च्या यशानंतर ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC 13) शानदार सीझन सोनी टीव्हीवर लवकरच परत येणार आहे. केबीसी नेहमीच जुलै महिन्यामध्ये प्रसारित होत असतो, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे शोचा मागील हंगाम जुलैऐवजी सप्टेंबर महिन्यात अगदी उशीराच सुरू झाला होता. या कार्यक्रमाच्या 13व्या पर्वाबद्दल बोलायचे, तर हे पर्व देखील ऑगस्टच्या आसपास सुरू होऊ शकते. सध्या सर्व मोठे रिअॅलिटी शोज मुंबईत शुटिंग सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पाहा KBC13चा प्रोमो :

 (Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati  season 13 announcement)

प्रेक्षकांशिवाय सुरू होईल चित्रीकरण

मागील वर्षी केबीसी कोणत्याही प्रेक्षकाविना शूट करण्यात आले होते. यावर्षी देखील परिस्थिती सुधारली नाही, तर एकदा निर्माता संघ प्रेक्षकांशिवायच शूटिंग करेल. मागील हंगामाप्रमाणे यावेळेसदेखील प्रेक्षकांच्या मतदानाऐवजी व्हिडीओ कॉल, फ्रेंड लाइफलाईन देण्यात येईल आणि करोडपती बनण्याच्या या संपूर्ण प्रवासामध्ये स्पर्धकांना 15 प्रश्न दिले जातील. या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन स्पर्धक 7 कोटी रुपये जिंकून लक्षाधीश होऊ शकतात.

कपिल शर्माही परतण्याची शक्यता!

केबीसीप्रमाणे कपिल शर्मादेखील या शोच्या पुनरागमनाबद्दल खूप उत्सुक आहे. अलीकडेच याची पुष्टी सलमान खानच्या टीमनेही केली आहे. एसकेटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदीम कोशियरी म्हणाले की, “कपिल शर्मा आणि शोची उर्वरित भन्नाट स्टारकास्ट देशभरातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव असून, आम्ही प्रेक्षकांना दररोज काहीतरी नवीन आणि रोमांचक देण्याचा प्रयत्न करत आहोत. नवीन कास्ट आणि टीमची नियुक्ती करणे हा याच उद्देशाचा एक भाग आहे.” कपिलही नव्या टीमबद्दल खूप उत्साही असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati  season 13 announcement)

हेही वाचा :

Photo : दिया मिर्झाच नाही, तर नताशा, कल्की, निना गुप्ता या अभिनेत्रीही होत्या लग्नाआधी प्रेग्नेंट!

Photo : अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनामुळे निधन, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.