Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांनी केला जया यांच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाले, मी कायमच वाचतो
बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित शो कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनला सुरूवात झालीये.

मुंबई : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच उंचाई हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत दिसले. अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांची जोडी चाहत्यांना जबरदस्त आवडली. विशेष म्हणजे यांच्या जोडीने मोठा धमाका केला.
उंचाई चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. चित्रपटाची स्टोरी ही चार मित्रांच्या मैत्रीवर आधारित होती. ज्यावेळी उंचाई हा चित्रपट रिलीज झाला. त्यावेळी बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले. मात्र, या अमिताभ बच्चन यांचा उंचाई हा चित्रपट अपवाद ठरला. अमिताभ बच्चन उंचाई चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना देखील दिसले.
आता नुकताच अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या कौन बनेगा करोडपती या शोच्या नव्या सीजनला सुरूवात झालीये. या शोची चाहते हे नेहमीच प्रतिक्षा करतात. नुकताच एक एपिसोड पार पडलाय. यावेळी अश्विन कुमार हे हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसलेले दिसत आहेत. अश्विन कुमार यांची पत्नी देखील कौन बनेगा करोडपतीमध्ये आलीये.
यावेळी अश्विन कुमार यांची पत्नी अमिताभ बच्चन यांना म्हणते की, यांनी कधीच मी तयार केलेले जेवण आवडत नाही. इतकेच नाही तर हे मला कधीच बाहेर देखील घेऊन जात नाहीत. हे सर्व अश्विन कुमार यांची पत्नी अमिताभ बच्चन यांना सांगत असतानाच अश्विन कुमार हे अमिताभ बच्चन यांनाच थेट मोठा प्रश्न विचारतात.
अश्विन कुमार हे अमिताभ बच्चन यांना म्हणतात की, तुम्ही कधी जया बच्चन यांना जेवणासाठी बाहेर घेऊन जातात का? यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, मुळात म्हणजे माझी पत्नी देखील काम करते. मी ज्यावेळी घरी जातो त्यावेळी ती संसदेत असते. त्यामुळे मी यासर्व गोष्टींपासून वाचतो. अमिताभ बच्चन यांचे उत्तर ऐकून सर्वजण हसतात.
अमिताभ बच्चन यांच्या घरी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या आल्या होत्या. यावेळी जवळपास दीड तास ममत बनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये चर्चा झाली. अमिताभ बच्चन यांनी ममता बनर्जी यांना त्यांच्या घरी चहाचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून अमिताभ बच्चन यांच्या घरी त्या पोहचल्या होत्या.