AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीला जन्म देताना ऐश्वर्याला झालेल्या यातना, सूनेची प्रशंसा करत अमिताभ बच्चन म्हणाले…

Amitabh Bachchan Praised Aishwarya Rai: जेव्हा ऐश्वर्या रायने इतके तास प्रसूती वेदना सहन करून आराध्याला दिला जन्म... सूनेचं कौतुक करत अमिताभ बच्चन म्हणाले होते..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांची चर्चा...

लेकीला जन्म देताना ऐश्वर्याला झालेल्या यातना, सूनेची प्रशंसा करत अमिताभ बच्चन म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 3:06 PM

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूडने मोस्ट पॉव्हरफूल कपल पैकी एक आहेत. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. पण काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात वाद सुरु आहेत… अशा चर्चांनी जोर धरला आहे. असं असताना देखील महानायक अमिताभ बच्चन यांचं सूनेसोबत असलेल्या नात्याची सर्वत्र चर्चा रंगत असते. बिग बी कायम ऐश्वर्या हिचं कौतुक करताना दिसतात. एकदा बिग बींनी आराध्याच्या जन्मादरम्यान प्रसूती वेदना सहन केल्याबद्दल ऐश्वर्या रायचे कौतुक केलं होतं.

आराध्या हिच्या जन्मानंतर, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला. चाहत्यांसोबत आनंद शेअर करण्यासाठी बिग बी आणि अभिषेक याने माध्यमांसोबत संवाद साधला होता. यादरम्यान, अमिताभ बच्चन यांनी प्रसूती वेदना दरम्यान ऐश्वर्याच्या सामर्थ्याची प्रशंसा केली होती. एवढंच नाही तर, ऐश्वर्या हिने सी-सेक्शनला नाही तर, नैसर्गिक प्रसूतीची निवड केली होती… असं देखील बिग बी म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

सूनेची प्रशंसा करत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘ऐश्वर्या हिला मोठा संघर्ष करावा लागला होता. कारण अधिक काळ, जवळपास 2-3 तास ऐश्वर्याला प्रसूती वेदना होत होत्या. पण ती नैसर्गिक प्रसूतीवर ठाम राहिली. या काळात ऐश्वर्या हिने कोणत्या एपिड्यूरल आणि पेन किलरचा देखील वापर केला नाही…’ असं देखील बिग बी म्हणाले होते.

कोणासारखी दिसते आराध्या?

माध्यमांसोबत बोलत असताना, अमिताभ बच्चन यांनी आराध्या कोणासारखी दिसते? हे देखील सांगितलं होतं. बिग बी म्हणाले होते आराध्या तिच्या आई सारखी दिसते. पुढे अमिताभ बच्चन विनोदी अंदाजात म्हणाले. ‘मुलांच्या चेहऱ्यामध्ये रोज बदल होत असतात. अनेक जण असं देखील म्हणतात की, आराध्या तिच्या वडिलांसारखी दिसते…’ असं देखील बिग बी म्हणाले होते.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन लवकरच ‘वेट्टैयन’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुपरस्टार रजनीकांत देखील दिसणार आहेत. वयाच्या 81 व्या वर्षी देखील बिग बी अभिनय विश्वात सक्रिय आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते असतात.