AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन दिग्गज सेलिब्रिटी, लहान भाऊ मात्र… भावंडांसोबत कसं आहे बिग बी यांचं नातं?

Amitabh Bachchan : लहान भावानेच दिला बिग बी यांना अभिनेता होण्याचा सल्ला, पण आज तो मात्र..., लहान भावाबद्दल अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचीच चर्चा....

अमिताभ बच्चन दिग्गज सेलिब्रिटी, लहान भाऊ मात्र... भावंडांसोबत कसं आहे बिग बी यांचं नातं?
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 9:06 AM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : अभिनेते आणि बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये दमदार काम करताना दिसत आहेत. अनेक सिनेमांच्या माध्यमातून बिग बी चाहत्यांच्या भेटील आले आणि त्यांनी चाहत्यांना आपलंस करुन घेतलं. आज अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या लहान भावाबद्दल फारसं कोणाला माहिती नाही. पण आता अमिताभ बच्चन यांनी खुद्द त्यांच्या लहान भावाबद्दल मोठी माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बिग बी आणि त्यांच्या लहान भावाबद्दल सर्वत्र चर्चा रंगत आहे.

अमिताभ बच्चन यांचा ‘कोन बनेगा करोडपती 15’ शोचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. शोमध्ये बिग बी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगत आसतात. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये बिग बी यांनी त्यांच्या लहान भावाबद्दल मोठा खुलासा केला…

अमिताभ बच्चन म्हणाले, ‘ भावंडांमध्ये जे कोणी लहान असतो, त्याच्यासाठी प्रत्येक जण काळजी करत असते. कुटुंबातील सर्व सदस्य मिळून त्याचा सांभाळ करतो.’ अमिताभ बच्चन यांच्या लहान भावाचं नाव अजिताभ बच्चन असं आहे. यावेळी बिग बी यांनी चाहत्यांना मोठी किस्सा सांगितला.

‘अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सल्ला मला माझ्या लहान भावाने दिला. त्याने माझा फोटो एका स्पर्धेसाठी पाठवून दिला होता. तेव्हा माझी निवड झाली नाही. पण अभिनेता होण्याचं स्वप्न माझ्या मनात घर करुन गेलं… अभिनेता होण्याच्या नादात मी माझी नोकरी सोडली…’ आज बिग बी बॉलिवूडचे महानायक आहेत आणि आजपर्यंत त्यांची जागा कोणी घेवू शकलं नाही..

अमिताभ बच्चन यांच्या लहान भावाबद्दल सांगायचं झालं तर, अजिताभ बच्चन झगमगत्या विश्वापासून दूर आहेत. अजिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासोबत लंडन याठिकाणी आनंदी आयुष्य जगत असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. अजिताब बच्चन आणि त्यांचं कुटुंब देखील बॉलिवूडपासून दूर आहे.

अजिताभ बच्चन यांच्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना चार मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावे नयना बच्चन, भीम बच्चन, निलिमा बच्चन आणि नम्रता बच्चन अशी आहेत. सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, बिग बी देखील त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात.