गंभीर आजारांचा सामना करतायेत ‘हे’ सेलिब्रिटी, उपचारानंतर चाहत्यांना केलं सावधान

serious diseases of celebrity : बॉलिवूड सेलिब्रिटी कायम दिसतात आनंदी पण करतात गंभीर आजारांचा सामना... उपचारानंतर चाहत्यांना देखील देतात मोलाचा सल्ला... अमिताभ बच्चन यांच्यापासून वरुण धवन याच्यापर्यंत अनेत सेलिब्रिटींना आहेत गंभीर आजार

गंभीर आजारांचा सामना करतायेत 'हे' सेलिब्रिटी, उपचारानंतर चाहत्यांना केलं सावधान
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 8:45 AM

serious diseases of celebrity : झगमगत्या विश्वातील सेलिब्रीटी कायम त्यांच्या सिनेमांमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असतात. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर देखील स्वतःचे फिटनेसचे व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असतात. पण बॉलिवूडमध्ये काही असे सेलिब्रिटी देखील आहेत, जे गंभीर आजारांचा सामना करत आहेत. सेलिब्रिटींनी मुलाखतीमध्ये स्वतःच्या आजाराबद्दल सांगितलं आणि चाहत्यांना देखील सावध राहाण्याचं आवाहन केलं. तर आज जाणून घेऊ सेलिब्रिटी आणि त्यांच्या गंभीर आजारांबद्दल…

अभिनेता समान खान : सलमान खान याला देखील गंभीर आजार आहे. 2011 मध्ये सलमान ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाच्या आजाराने त्रस्त होता. या आजारामुळे चेहरा आणि शरीरातील नसा दुखतात. हा एक गंभीर आजार आहे. सलमान याने एका मुलाखतीत स्वतःच्या आजाराबद्दल सांगितलं होतं.

अभिनेते अमिताभ बच्चन : बिग बी यांच्या प्रकृतीबद्दल काही जरी समोर आलं तरी चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण असतं. पण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक आजारांचा सामना केला आहे. बिग बी याच्या पोटाला दुखापत झाली होती. ज्यामुळे ते अनेक दिवस रुग्णालयात होते. पुढे त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या आजारानेही ग्रासले. याचा खुलासा खुद्द बिग बी यांनी केला आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू : या या यादीत अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचं देखील नाव आहे. अभिनेत्री सामंथा मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त आहे. खुद्द अभिनेत्रीनेच गेल्या वर्षी याचा खुलासा केला होता. अभिनेत्री दररोज तिच्या चाहत्यांना तिच्या प्रकृतीचे अपडेट्स देत असते.

अभिनेता वरुण धवन : वरुण धवन देखील गंभीर आजाराने त्रस्त आहे. वरुण धवन व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. वरुण धवनने सांगितले होते की, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला दबाव जाणवू लागला, त्यामुळे त्याला वेस्टिबुलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाला आहे. खुद्द अभिनेत्याने मुलाखतीत आपल्या आजाराचा खुलासा केला होता.

सांगायचं झालं तर, आजच्या धावपळीच्या विश्वात अनेक आजार डोकंवर काढतात. ज्या आजारांची नावे देखील आपण कधी ऐकली नसतील किंवा आजारांचे लक्षणं देखील आपल्याला माहिती नसतात. सेलिब्रिटी कायम आरोग्य आणि आहाराबद्दल बोलताना दिसतात. अवेळी जेवण, फास्ट फूड, लाईफस्टाईल इत्यादी गोष्टींमुळे नको ते आजार डोकं वर काढतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.