Amitabh Bachchan : जया बच्चन नाही तर, कोणाच्या नावावर आहे बिग बी यांची कोट्यवधींची संपत्ती?

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीची वाटे कोणामध्ये होणार? जया बच्चन नाही तर, कोणाच्या नावावर आहे कोट्यवधींची संपत्ती? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा... संपत्तीवर बिग बी यांचं मोठं वक्तव्य

Amitabh Bachchan : जया बच्चन नाही तर, कोणाच्या नावावर आहे बिग बी यांची कोट्यवधींची संपत्ती?
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 10:16 AM

मुंबई | 17 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम त्यांच्या सिनेमांमुळे, कुटुंबामुळे, रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग सोशल मीडियावर सक्रिय असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन सेलिब्रिटींनी पदार्पण केलं, पण बिग बी यांची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. अमिताभ बच्चन बॉलिवूडचे फक्त दिग्गज अभिनेते नसून गडगंड श्रीमंत अभिनेते देखील आहेत.

सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. एकदा खुद्द अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपत्तीबद्दल मोठी घोषणा केली होती.. संपत्तीचं वाटप कोणामध्ये करतील? याचा खुलासा खुद्द बिग बी यांनी केला होता. ‘संपत्तीचं वाटप मुलगा – मुलीमध्ये करेल…’ असं वक्तव्य बिग बी यांनी केलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्या म्हणण्यानूसार, बिग बी यांच्या संपत्तीचं वाटप मुलगी श्वेता बच्चन – नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यात होणार आहे. ‘लाईफस्टाईल एशिया’च्या रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांच्याकडे तब्बल 3 हजार 190 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बिग बी यांची संपत्ती फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील आहे.

बच्चन कुटुंबाकडे खासगी जेट देखील आहे. अमिताभ बच्चन यांच्या खासगी जेटची किंमत तब्बल 260 कोटी रुपये आहे. शिवाय बिग बी यांच्याकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ या बंगल्याची किंमत 112 कोटी रुपये आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडे जलसा बंगल्या शिवाय, प्रतीक्षा, जनक, वत्स यांसारखी अनेक घरं आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे. बिग बी कायम त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बिग बी कायम स्वतःचे फोटो आणि महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करतात. चाहते देखील अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.