AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBM 4: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अमृता फडणवीसांची एण्ट्री; कोणता ट्विस्ट येणार?

बिग बॉसच्या घरात किरण माने यांचा अमृता फडणवीसांना मजेशीर सवाल

BBM 4: 'बिग बॉस मराठी'च्या घरात अमृता फडणवीसांची एण्ट्री; कोणता ट्विस्ट येणार?
Amruta FadnavisImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 12:33 PM

मुंबई- बिग बॉस मराठीचं चौथं सिझन (Bigg Boss Marathi 4) सध्या रंगतदार वळणावर येऊन पोहोचलं आहे. संपूर्ण देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह असताना बिग बॉसच्या घरातही हा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त बिग बॉसच्या घरात खास पाहुणीला आमंत्रित करण्यात आलं आहे. ही पाहुणी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, समाजसेविका आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis). अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत घरातील सदस्य मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करणार आहेत.

बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस यांच्यासमोर सदस्यांचं साप्ताहिक कार्य रंगलं. यावेळी किरण माने आणि यशश्री यांनी अमृता यांना काही प्रश्नदेखील विचारले. या प्रश्नांची उत्तर अमृता यांनी मनमोकळेपणाने दिली.

देवेंद्रजींचा फराळातला आवडता पदार्थ कुठला, असा प्रश्न यशश्रीने अमृता यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अमृता म्हणाल्या, “देवेंद्रजींना मोदक आणि करंजी खूप आवडतात.”

हे सुद्धा वाचा

यावेळी किरण माने यांनी राजकारणाशी संबंधित मजेशीर प्रश्न विचारला. “तुम्हाला माहितच असेल की बिग बॉसच्या घरात कॅप्टनपद खूप महत्त्वाचं असतं. पण बिग बॉसच्या घराबाहेर महाराष्ट्राचा कॅप्टन कोण आहे”, असं त्यांनी विचारलं.

किरण माने यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना अमृता म्हणाल्या, “मी तुम्हाला दोन नावं सांगेन, जे महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत. त्यापैकी एक प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन आहे. एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे दोघं राज्याचे कॅप्टन आहेत.”

बिग बॉस मराठीच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये अमृता फडणवीस यांनी ‘कजरा रे कजरा रे’ या गाण्यावर ठेकासुद्धा धरला. बिग बॉसच्या घरातील ही धमाल मजा प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवारी रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री 9.30 वाजता पहायला मिळणार आहे.

सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.