AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amy Jackson | ॲमी जॅक्सनचा नवा लूक पाहून चाहते थक्क; म्हणाले ‘प्लास्टिक जरा जास्तच..’

'एक दिवाना था' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री ॲमी जॅक्सन सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. ॲमीने सोशल मीडियावर नुकताच स्वत:चा फोटो पोस्ट केला असून त्यावरून तिला ट्रोल केलं जातंय. ॲमी जॅक्सनने प्लास्टिक सर्जरी केल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

Amy Jackson | ॲमी जॅक्सनचा नवा लूक पाहून चाहते थक्क; म्हणाले 'प्लास्टिक जरा जास्तच..'
ॲमी जॅक्सन Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 2:22 PM

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री ॲमी जॅक्सन तिच्या सौंदर्यामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. ॲमी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असून इंस्टाग्रामवर ती बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ॲमी तिच्या नव्या लूकमध्ये पहायला मिळतेय. मात्र तिचा नवीन लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ॲमीचा हा फोटो पाहून काही लोकांना ‘ओपनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटातील सिलियन मर्फी अभिनेत्याची आठवण आली. ॲमीचं अजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरांना तिला ओळखलंच कठीण झालं आहे.

ॲमी जॅक्सनने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन लूकचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती अत्यंत वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळतेय. तिला या फोटोत ओळखणंही कठीण जात आहे. सोशल मीडियावर ॲमीचा हा नवीन लूक चांगलाच व्हायरल होत आहे. ॲमी नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते, मात्र तिचा हा नवीन लूक पाहून अनेक जण नाराज झाले आहेत. ॲमीच्या लूकमधील हा बदल पाहून तिने प्लास्टिक सर्जरी केली का असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson)

ॲमीच्या फोटोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘अयशस्वी सर्जरी, प्लास्टिक जरा जास्तच झाली नाही का’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘विश्वास बसत नाहीये. ही तीच ॲमी आहे का,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ॲमी सर्वात सुंदर अभिनेत्री होती. मात्र या फोटोत तिला ओळखताच येत नाहीये. आता माझी क्रश ही क्रश राहिली नाही,’ अशाही शब्दात नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. काहींनी तिच्या या लूकची तुलना ‘ओपनहायमर’मधील सिलियन मर्फी या हॉलिवूड अभिनेत्याशी केली आहे.

ॲमी जॅक्सन तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत होती. अभिनेता प्रतीक बब्बरसोबतचं तिचं नातं सर्वाधिक चर्चेत होतं. ‘एक दिवाना था’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रतीक आणि ॲमी एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघं त्यावेळी प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. ब्रेकअपनंतरचा काळ प्रतीकसाठी फार अवघड होता. त्याला नैराश्याचाही सामना करावा लागला होता.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.