Jawan | शाहरुख खान याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या क्लिप चोरीला, थेट एफआयआर दाखल, वाचा नेमके प्रकरण काय?
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे एका मागून असे चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हा ठरला आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. शाहरुख खान याचे एक मागून एक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) धमाका करताना दिसला आणि शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला. शाहरुख खान याच्या चित्रपटांना चाहते हे मोठ्या प्रमाणात प्रेम देताना दिसत आहेत.
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाला आणि धमाल केली. विशेष म्हणजे अनेकांनी अगोदर पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी केली होती. मात्र, शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओपनिंगलाच धमाका केला.
आता शाहरुख खान हा त्याच्या आगामी जवान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन हे केले होते.
नुकताच जवान चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जवान चित्रपटाचे काही व्हिडीओ आणि क्लिप व्हायरल होताना दिसत आहेत. यावर आता कायदेशीर पाऊल उचलण्यात आले आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटने जवान चित्रपटाच्या काही क्लिप चोरी केल्या आणि ऑनलाइन लीक केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केले आहे.
या प्रकरणात मुंबईमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात 10 ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून करण्यात आला आहे. जवान चित्रपटाचे व्हिडीओ किंवा क्लिप व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाहीये.
यापूर्वीही जवान चित्रपटाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा आता जवान चित्रपटानंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान याचा आता जवान हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे आगामी चित्रपटाचे शूटिंग करत शाहरुख खान दिसला होता.