Ambani wedding : अनंत यांच्या लग्नाला येण्यासाठी सेलिब्रिटींना कुठला फॉर्म भरला? एन्ट्रीसाठी काय होते नियम?
Ambani wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाला न बोलवताच दोन पाहुणे पोहोचले होते. प्रत्येक पावलावर पोलीस, खासगी सुरक्षा गार्ड उपस्थित होते. अनेक सुरक्षा चक्र भेदून त्यांना मुख्य कार्यक्रम स्थळी पोहोचायच होतं. प्री वेडिंगच्या वेळी क्यूआर कोडची विक्री झाल्याने न बोलवता अनेक पाहुणे तिथे पोहोचले होते.
देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. VVIP लोकांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा चक्र बनवण्यात आलं होतं. जेणेकरुन, कोणाला हे सुरक्षा चक्र भेदता येऊ नये. याआधी प्री वेडिंगच्यावेळी वेगळी व्यवस्था केली होती. प्री वेडिंगच्या वेळी क्यूआर कोडची विक्री झाल्याने न बोलवता अनेक पाहुणे तिथे पोहोचले होते.सुरक्षा बंदोबस्ताबद्दल बोलायच झाल्यास लग्नाचे कार्ड वाटतानाच व्यवस्था करण्यात आली होती. ज्या सेलिब्रिटींना लग्नाच कार्ड मिळालं, त्यांना गुगल फॉर्म भरुन लग्नाला येण्याच अप्रूवल द्यायच होतं. त्यांना त्यांच्या येण्याची वेळ कळवावी लागणार होती. जेणेकरुन त्यांच्यासाठी व्यवस्था करता येईल.
अप्रूवलनंतर अंबानी कुटुंबाकडून रिस्पॉन्स पाठवण्यात आला. आम्ही तुमच्या स्वागतासाठी उत्सुक्त आहोत, असं त्यात म्हटलेलं. कार्यक्रमाला पोहोचण्याच्या सहातास आधी एक क्यूआर कोड पाठवण्यात येणार होता. सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली. प्री वेडिंगप्रमाणे विक्री होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली.
त्यामुळेच ते पकडले गेले
अनंत अंबानीच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना सहातास आधी क्यू आर कोड पाठवण्यात आलेला. आंध्र प्रदेशातून निमंत्रणाशिवाय आलेल्या या दोन पाहुण्यांना कदाचित याची कल्पना नसावी. त्यामुळेच ते पकडले गेले. त्या शिवाय पाहुण्यांच्या हातावर वेगवेगळे रिस्ट बँड बांधलेले. जरी सुरक्षा व्यवस्था पार करुन ते आत आले असते, तरी रिस्ट बँडमुळे सापडलेच असते. पाहुण्यांना जे रिस्ट बँड दिले होते. त्यांना त्याच क्षेत्रात जायचं होत. अंबानी कुटुंबाने विवाह स्थळी डॉक्टरांची व्यवस्था सुद्धा सज्ज ठेवली होती.
पोलीस ऐनवेळी Active झाले
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाला न बोलवताच दोन पाहुणे पोहोचले होते. प्रत्येक पावलावर पोलीस, खासगी सुरक्षा गार्ड उपस्थित होते. अनेक सुरक्षा चक्र भेदून त्यांना मुख्य कार्यक्रम स्थळी पोहोचायच होतं. पोलीस ऐनवेळी Active झाले नसते, तर ते पोहोचले सुद्धा असते. या दोन्ही व्यक्ती आंध्र प्रदेशच्या आहेत. पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.