Anant Ambani Wedding : मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट बॉक्स दिला, त्यात काय आहे?

Anant Ambani Wedding : रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुलाच आज लग्न आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्ताने जगभरातून पाहुणे मुंबईत येणार आहेत. अंबानींच्या घरच लग्न म्हणजे रिर्टन गिफ्टची चर्चा तर होणारच. प्रत्येक पाहुण्यासाठी खास गिफ्ट आहेच. पण रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मुकेश अंबानी विसरलेले नाहीत. या खास प्रसंगी त्यांनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा खास गिफ्ट दिलय.

Anant Ambani Wedding : मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट बॉक्स दिला, त्यात काय आहे?
Anant Ambani Radhika Merchant Wedding Card
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 3:26 PM

आज मुंबईत एक महत्त्वाचा लग्न सोहळा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच आज लग्न आहे. राधिका मर्चेंट सोबत अनंत अंबानी यांची आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाणार आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील जियो वर्ल्ड सेंटर येथे हे लग्न होणार आहे. या लग्नासाठी देश-विदेशातून पाहुणे आले आहेत. लग्नासाठी जे परदेशी पाहुणे आलेत, त्यांच्या निवासाची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही VVIP पाहुण्यांना खास घड्याळाच्या रुपाने कोट्यवधी रुपयांच गिफ्ट मिळणार आहे. अन्य पाहुण्यांसाठी काश्मीर, राजकोट आणि वाराणसीतून स्पेशल गिफ्ट मागवण्यात आले आहेत. बांधनीची ओढणी आणि साडी असे गिफ्टस या लग्नात असतील.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा खास काळजी घेतली आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्ताने रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना स्पेशल गिफ्ट बॉक्स देण्यात आला आहे. रिलान्सच्या अनेक कर्मचाऱ्यांनी गिफ्ट बॉक्सचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या या गिफ्ट बॉक्सवर सोनेरी अक्षरात लिहिलेलं आहे. “देवी-देवतांच्या ईश्वरी आशिर्वादाने आम्ही अनंत-राधिकाच लग्न सेलिब्रेट करतोय. निता-मुकेश अंबानींकडून शुभेच्छा” या बॉक्सच्या आता हल्दीराम नमकीनचे चार पॅकेट आहेत. आलू भुजिया शेव आणि चिवडा आहे. मिठाईचा बॉक्स आहे. चांदीच नाणं आहे.

या लग्नासाठी 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शेफ

या लग्नासाठी 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शेफना बोलवण्यात आलं आहे. इंडोनेशियाची कोकोनट कॅटरिंग कंपनी 100 पेक्षा जास्त नारळी पदार्थांच्या डिश बनवणार आहे. 2500 पेक्षा जास्त डिश मेन्यू लिस्टमध्ये आहेत. काशीचा चाट आणि मद्रास कॅफेची फिल्टर कॉफी सुद्धा यामध्ये आहे. इटालियन आणि यूरोपियन स्टाइल फूड सुद्धा असेल. इंदूरच गराडू चाट, मुंगलेट आणि केसर क्रीम वडा सुद्धा मेन्यूमध्ये असेल. देशाच्या वेगवेगळ्या भागातून स्पेशल फूड स्टॉल लावण्यात येतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.