Ananya Panday | ‘अभिनय जमत नसलं तरी..’; आदित्यसोबतच्या व्हायरल फोटोंवरून अभिनेत्याने अनन्याला मारला टोमणा
अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. यावर दोघं कधीच मोकळेपणे बोलले नाहीत. मात्र त्यांच्या डेटिंगचा पुरावाच आता थेट नेटकऱ्यांच्या हाती लागला आहे.
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर सध्या एका जोडीची जोरदार चर्चा होत आहे. ही जोडी आहे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांची. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत्याच. त्यावर दोघांनी मोकळेपणे कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्याचा पुरावाच थेट नेटकऱ्यांच्या हाती लागला आहे. स्पेनमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवतानाचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनन्या आणि आदित्यच्या जोडीवर याआधीही काही नेटकऱ्यांनी नापसंती दर्शविली होती. मात्र आता एका अभिनेत्यानेच थेट अनन्यावर निशाणा साधला आहे.
‘अनन्या पांडे ही अभिनय करण्यात जरी कमकुवत असली तरी प्रेम करण्यात एकदम सुपरफास्ट आहे. या मुलीला मिनिटांमध्ये प्रेम होतं. कधी आर्यनवर, कधी खट्टरवर (इशान खट्टर), कधी सिद्धांतवर तर कधी आदित्यवर. पण फक्त फ्लॉप लोकांवरच ही प्रेम करते. तिने चंकी पांडेचं नाव उज्ज्वल केलंय’, अशा शब्दांत या अभिनेत्याने अनन्याला टोमणा मारला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे.
Ananya Pandey acting Karne main Bhale Hi Kamzor Ho, Lekin Pyar Karne main Ek Dum Super Fast Hai. Iss Ladki Ko minutes main Pyar Hota Hai. Kabhi Aryan Se, Kabhi Khattar Se, Kabhi Sidhant Se Toh Kabhi Aditya Se. Lekin Hota Sirf flop Se Hai. Chunky Pandey Ka Naam Roshan Kar Diya. pic.twitter.com/dqkRlIOCLj
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2023
आदित्य आणि अनन्याला स्पेनमधील लिस्बॉनमध्ये एकमेकांसोबत पाहिलं गेलं. त्याआधी दोघांनी एकत्र आर्क्टिक मंकीज या रॉक बँडच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये कॉन्सर्टचे फोटो पोस्ट केले होते. तेव्हापासून त्यांच्या स्पेन व्हेकेशनची चर्चा होती. मात्र स्पेनमधील जेव्हा या दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले, तेव्हा मात्र त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू झाली. यावेळी दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अनन्याला मिठी मारत आदित्य स्पेनमधील सूर्यास्त पाहत असल्याचा हा फोटो व्हायरल झाला.
View this post on Instagram
गेल्या वर्षी जेव्हा या दोघांनी एकत्र अभिनेत्री क्रिती सनॉनच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत. मात्र दोघांनीही त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता फोटो व्हायरल झाल्यापासून काही नेटकऱ्यांनी अनन्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी अनन्याची बाजू घेतली आहे. ती अभिनेत्री म्हणून कमकुवत असली तरी जोडीदार म्हणून उत्तम असेल, असं एकाने म्हटलं. तर आदित्यला अनन्यापेक्षा खूप चांगली मुलगी भेटू शकते, असं काहींनी म्हटलंय.