Ananya Panday | ‘दाल तडके की बाल्टी’; अनन्या पांडेच्या पर्सवर नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स

'पर्स आहे की बादली' असं एकाने लिहिलंय. तर 'दाल तडके की बाल्टी' असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'पर्स नाही ती बाल्टी आहे, पार्टीमध्ये त्यात तिला दाल मखनी भरून मिळेल' अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

Ananya Panday | 'दाल तडके की बाल्टी'; अनन्या पांडेच्या पर्सवर नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट्स
Ananya PandayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 11:50 AM

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना अनेकदा स्टायलिश कपड्यांमध्ये पाहिलं जातं. अनेकदा हे सेलिब्रिटी त्यांच्या कपड्यांपेक्षा जास्त कधी दागिन्यांमुळे तर कधी फॅशनेबल पर्समुळे चर्चेत येतात. अशाच एका कारणासाठी अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अनन्याने नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र तिच्या या लूकपेक्षा हातातील छोट्याशा पर्सचीच जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर अनन्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अनन्याच्या हातात सोनेरी रंगाची एक पर्स पहायला मिळतेय. ही पर्स एका बादलीच्या आकाराची आहे आणि त्यामुळेच अनन्याला ट्रोल केलं जातंय. ‘पर्स आहे की बादली’ असं एकाने लिहिलंय. तर ‘दाल तडके की बाल्टी’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘पर्स नाही ती बाल्टी आहे, पार्टीमध्ये त्यात तिला दाल मखनी भरून मिळेल’ अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. ‘दाल फ्राय घेऊन आली आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. अनन्याने त्या पर्समध्ये नेमकं ठेवलं तरी काय, असाही प्रश्न काहींना पडला आहे.

हे सुद्धा वाचा

अनन्या ही चंकी पांडेची मुलगी आहे. त्यामुळे घराणेशाहीवरून तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. ‘या पर्सची साइज तिच्या स्ट्रगलइतकीच आहे’ अशी टीका एका युजरने केली. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या बॉयकॉट कल्चरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “इथे दररोज कोणाला तरी बॉयकॉट केलं जातं. त्यामुळे गोष्टींकडे फार गंभीरतेने पाहू नये हे मी शिकलेय”, असं ती म्हणाली.

पहा व्हिडीओ

अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत तिचं नाव जोडलं जात आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये या दोघांना एकत्र रॅम्प वॉक करताना पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण त्याआधीपासून अनन्या आणि आदित्य एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. या दोघांनी अद्याप रिलेशनशिपची कबुली दिली नाही किंवा चर्चांना नकारही दिला नाही. त्यामुळे त्यांच्यात नेमकं काहीतरी शिजतंय, अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

रॅम्प वॉकशिवाय आदित्य आणि अनन्याला विविध ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. दिवाळी पार्टीत जेव्हा दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे घालून एण्ट्री केली, तेव्हा सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. अनन्याने जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली, तेव्हा करणने तिला थेट प्रश्न विचारला होता. “मी तुला माझ्या पार्टीत पाहिलं होतं. तुझ्यात आणि आदित्य रॉय कपूरमध्ये काय शिजतंय”, असं त्याने विचारलं. त्यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली, “मला आदित्य रॉय कपूर हॉट वाटतो.”

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.