अनन्या पांडे हिने केला तिच्या ‘ड्रीम हाऊस’बद्दल मोठा खुलासा, थेट फोटो…

अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनन्या पांडे हिचा काही दिवसांपूर्वीच लाईगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटात साऊथचा मोठा स्टार भूमिकेत धमाका करताना दिसला.

अनन्या पांडे हिने केला तिच्या 'ड्रीम हाऊस'बद्दल मोठा खुलासा, थेट फोटो...
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 4:52 PM

मुंबई : चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने अत्यंत आलिशान असे घर खरेदी केले. या घराच्या पूजेचे काही फोटो हे अनन्या पांडे हिने शेअर केले. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिने खरेदी केलेले हे घर कोट्यवधी रूपयांचे आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या कमाईमधून अनन्या पांडे हिने हे घर खरेदी केले. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिच्या या घराचे इंटीरिअर डिझाईन शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान हिने केले. सुहाना खान आणि अनन्या पांडे या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

नुकताच अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर काही खास फोटो तिच्या घरातील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या पांडे हिच्यासोबत गाैरी खान ही दिसत आहे. गाैरी खान हिने अनन्या पांडे हिचे घर अत्यंत खास असे डिझाईन केल्याचे त्या फोटोमधून स्पष्ट दिसत आहे. हाॅलमधील दोन फोटो हे अनन्या पांडेने शेअर केले आहेत.

या फोटोसोबतच अनन्या पांडे हिने खास कॅप्शन दिले असून यासोबतच ती गाैरी खानचे धन्यवाद मानताना या फोटोमध्ये दिसत आहे. फक्त अनन्या पांडे हिच नाही तर गाैरी खान हिने बऱ्याच कलाकारांचे घर डिझाईन करून दिली आहेत. आलिया भट्ट हिच्यापासून ते कियारा अडवाणी हिच्यापर्यंत अशी मोठी लिस्ट यामध्ये आहे.

आता अनन्या पांडे हिने शेअर केलेल्या या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये अनन्या पांडे आणि गाैरी खान या हाॅलमध्ये उभ्या दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये या सोप्यावर बसल्याचे बघायला मिळतंय. आता अनन्या पांडे हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे ही या नव्या घरात राहण्यासाठी गेलीये. अनन्या पांडे ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. इतकेच नाही तर मुंबईमध्ये अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट झाले आहेत. विदेशातही धमाल करताना आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे दिसले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.