इतकी कसली घाई? जितेंद्र यांना धक्का मारल्याने अनिल कपूरच्या मुलीवर भडकले नेटकरी

रिया कपूरचा 'थँक्यू फॉर कमिंग' हा चित्रपट आज म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण बुलानी यांनी केलं असून त्यामध्ये भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, डॉली सिंग, शिवानी बेदी आणि अनिल कपूर यांच्या भूमिका आहेत.

इतकी कसली घाई? जितेंद्र यांना धक्का मारल्याने अनिल कपूरच्या मुलीवर भडकले नेटकरी
Anil Kapoor daughter RheaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 1:19 PM

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि अनिल कपूर हे त्यांच्या मुलींचा चित्रपट प्रमोट करण्यासाठी एकत्र आले आहेत. अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि जितेंद्र यांची मुलगी एकता कपूर यांनी मिळून ‘थँक्यू फॉर कमिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आजच (6 ऑक्टोबर) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यापूर्वी मुंबईत नुकत्याच एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंचावर अभिनेते जितेंद्र, जॅकी श्रॉफ, रिया कपूर, अनिल कपूर असे बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते, मात्र मंचावर घडलेल्या एका घटनेनंतर अनिल कपूर यांच्या मुलीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. रिया कपूर ही अनिल कपूर यांची छोटी मुलगी आहे.

अनिल कपूर यांच्या मुलीकडून मंचावर चूक

रियाने ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरसोबत मिळून केली. नुकतंच या दोघींनी चित्रपटाच्या स्क्रीनिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी मंचावर रियाकडून अनवधानाने एक चूक झाली. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी तिला खरंखोटं सुनावत आहेत.

रिया कपूर नेटकऱ्यांकडून ट्रोल

या व्हिडीओत दिसतंय की अभिनेते जॅकी श्रॉफ यांना भेटण्यासाठी रिया कपूर पुढे जाते. मात्र तिच्या बाजूला उभे असलेले अभिनेते जितेंद्र यांच्याकडे ती दुर्लक्ष करते. यावेळी जितेंद्र यांना रियाचा धक्का लागतो आणि स्टेजवर ते अडखळतात. जितेंद्र यांच्या बाजूला उभे असलेले कलाकार त्यांना सावरतात. त्याचवेळी रियाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि त्यांचा हात पकडून ती माफी मागते. मात्र त्यानंतर जेव्हा ती जॅकी श्रॉफ यांच्यासोबत बोलू लागते, तेव्हा जितेंद्र तिचा हात पकडूनच उभे असतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जितेंद्र यांचे चाहते रियावर चांगलेच भडकले आहेत. इतकी कसली घाई होती की तुझ्या बाजूलाच उभे असलेले ज्येष्ठ अभिनेते तुला दिसले नाहीत, असं एकाने लिहिलं. तर माफीसुद्धा नीट मागता आली नाही. इतका कसला अहंकार, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.