Aishwary Rai असती ‘गदर’ची हिरोईन; दिग्दर्शकाने सांगितलं रहस्य, कुठे झाली गडबड?
Aishwary Rai | 'गदर' सिनेमात अमिषा पटेल हिच्या जागी असती ऐश्वर्या राय... पण तेव्हा नक्की झालं तरी काय? ज्यामुळे अमिषा पटेल हिला मिळाली संधी... सध्या सर्वत्र 'गदर' आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची चर्चा... अखेर अनेक वर्षांनंतर 'गदर' सिनेमाच्या दिग्दर्शकांनी सांगितलं मोठं सत्य..
मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांचे भरभरुन मनोरंजन केलं. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर ‘गदर २’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि सनी देओल यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात मोठी गर्दी केली. ‘गदर २’ सिनेमाने अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. सिनेमा आजही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने आतापर्यंत ५४२.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ‘गदर २’ सिनेमामुळे अमिषा पटेल हिला देखील बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करण्याची संधी मुळाली…
आज ‘गदर’ आणि ‘गदर २’ सिनेनामुळे जी लोकप्रियता आणि प्रसिद्धी अमिषा मिळाली आहे, तिच लोकप्रियता आणि प्रिसिद्धी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला मिळाली असती. ‘गदर’ सिनेमाबाबत एक मोठं रहस्य अनेक वर्षांनंतर समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मोठा खुलासा केला आहे.
अनिल शर्मा यांनी सांगितलं कारण
अनिल शर्मा म्हणाले, ‘निर्मात्यांनी एका अभिनेत्रीसोबत संवाद साधला होता आणि ती सिनेमात सकिना ही भूमिका साकारण्यासाठी देखील तयार होती. माझ्या डोक्यात अनेक अभिनेत्रींची नावे होती. मी त्यांना स्क्रिप्ट देखील सांगितली होती. काही अभिनेत्रींना स्क्रिप्ट आवडली, तर काहींनी सिनेमा करण्यास नकार दिला.’
अभिनेत्रींनी सिनेमाला का नकार दिला… याचं कारण अनिल शर्मा यांनी सांगितलं नाही. पण सिनेमासाठी त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय यांना विचारलं होत्या. ‘सिनेमात सकिना ही भूमिका बजावण्यासाठी अभिनेत्रींनी मानधन जास्त मागितलं म्हणून निर्मात्यांनी सिनेमात अभिनेते अमरीश पुरी महत्त्वाचे असल्याचं सांगितलं…’ असं देखील अनिल शर्मा म्हणाले.
सिनेमात अभिनेते अमरीश पुरी यांनी अशरफ अली या भूमिकेला न्याय दिला. म्हणून आजही अमरीश पूरी यांची आठवण काढली जाते. त्यांचे डायलॉग आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या सर्वत्र ‘गदर’ आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची चर्चा सुरु आहे.