’25 वर्षांत एक हिट दिल्यानंतर इतका माज?’, बॉबी देओलची वागणूक पाहून भडकले नेटकरी

बॉबी देओलचा दिल्ली एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्याला दिलेली वागणूक पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. एक हिट चित्रपट दिल्यानंतर सेलिब्रिटींना किती माज येतो, अशा शब्दांत नेटकरी टीका करत आहेत.

'25 वर्षांत एक हिट दिल्यानंतर इतका माज?', बॉबी देओलची वागणूक पाहून भडकले नेटकरी
Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 8:50 PM

मुंबई : 14 डिसेंबर 2023 | अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने अबरार हक ही खलनायकी भूमिका साकारली आहे. चित्रपटात त्याला एकही डायलॉग नसताना आणि मर्यादित स्क्रीन टाइम असतानाही बॉबीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून जोरदार कौतुक होत आहे. मात्र अशातच बॉबी देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत. दिल्ली एअरपोर्टवरील हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत बॉबी देओल हा अत्यंत घाईगडबडीने एअरपोर्टच्या आत जाताना दिसत आहे. अशातच त्याच्या जवळ एक चाहता येतो आणि बॉबी त्याला धक्का देत पुढे निघून जातो. त्याचं हेच वागणं नेटकऱ्यांना खटकलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकजण बॉबीला ट्रोल करत आहेत. ’25 वर्षांत एक हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेते चाहत्यांना अशी वागणूक देतात’, असं एकाने म्हटलंय. तर ‘यश याच्या डोक्यावर चढलंय’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘बॉबीला लॉर्ड का म्हटलं जातंय’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

काही दिवसांपूर्वी बॉबी देओलचा भाऊ आणि अभिनेता सनी देओलचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘गदर 2’ या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलचा हा व्हिडीओ समोर आला होता. एअरपोर्टवर एक चाहता त्याच्याकडे सेल्फी क्लिक करण्यासाठी गेला होता, तेव्हा सनी देओल त्याच्यावर भडकल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी खूप टीका केली होती. नंतर सनीने त्यावर स्पष्टीकरणदेखील दिलं होतं.

“माझा तसा वागण्याचा काहीच हेतू नव्हता. अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे मी दु:खी झालो पण मला पुढे चालत राहावं लागलं. अर्थातच चाहते तुमच्यावर प्रेम करतात आणि आम्हीसुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतो. अनेकदा सेल्फी क्लिक करून झाल्यानंतर ते तिथून हलत नाही. अशा वेळी एखादी व्यक्ती मला रेकॉर्ड करतेय याचा विचार मी करत नाही. मला पुढे जाऊ द्या, इतकाच विचार माझ्या डोक्यात असतो. ही गोष्ट कृपया तुम्ही समजून घ्या. चाहत्यांसोबत माझं भावनिक कनेक्शन आहे”, असं त्याने म्हटलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.