‘ॲनिमल’ मधला ‘तो’ डीलिट केलेला सीन प्रचंड व्हायरल, काय आहे त्यात ? का केला डीलिट ?

'ॲनिमल' चित्रपटातील डिलीट केलेा एक सीन बराच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सना हा सीन बराच आवडल्याचं दिसत आहे. खरंतर रेडिटवर ॲनिमल चित्रपटातील एक सीन खूप व्हायरल झाला.

'ॲनिमल' मधला 'तो' डीलिट केलेला सीन प्रचंड व्हायरल, काय आहे त्यात ? का केला डीलिट ?
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 1:16 PM

मुंबई | 12 डिसेंबर 2023 : रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि तृप्ति डिमरी यांच्या प्रमुख भूमिकेमुळे गाजणाऱ्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. प्रेक्षकांना तर चित्रपट प्रचंड आवडला आहेच पण बॉक्स ऑफीसवरही चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. प्रमुख कलाकारांचा खणखणीत अभिनय याशिवाय चित्रपटातील ॲक्शन सीन्सही बऱ्याच जणांना आवडलेत. त्याशिवाय हा चित्रपट त्याच्या रन टायमिंगमुळेही बराच चर्चेत आहे. हा चित्रपट सव्वा तीन तासांपेक्षा जास्त आहे. ॲनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी हा चित्रपट बराच एडिट केला आहे.

मात्र आता याच चित्रपटातील डिलीट केलेा एक सीन बराच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सना हा सीन बराच आवडल्याचं दिसत आहे. खरंतर रेडिटवर ॲनिमल चित्रपटातील एक सीन खूप व्हायरल झाला. जो चित्रपटातील डिलीटेड सीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या सीनमध्ये रणबीर कपूर हा त्याच्या गँगसह प्लेन चालवताना दिसतोय. हा सीन पिक्चरमध्ये दाखवलेलाच नाही, असा दावा अनेक लोकांनी केलाय. 15 सेकंदांचा हा सीन सोशल मीडियावर सध्या धूमाकूळ माजवतोय. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा पिक्चर ठरलाय.

Don’t drink & drive, Just drink & fly byu/LimpCoco inbollywoodmemes

दुसऱ्या वीकमध्येही तूफान कमाई

1 डिसेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाची दुसऱ्या आठवड्यातही घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या वीकेंडला या पिक्चरने 87.56 कोटींची कमाई केली. हा कमाईच्या बाबतीतील सर्वात मोठा दुसरा वीकेंड होता. 10 दिवसांत रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि तृप्ति डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 63.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 कोटी आणि सातव्या दिवशी 24.23 कोटी रुपये कमाई केली. ज्यामुळे या चित्रपटाचे पहिल्या आठवड्याचं कलेक्शन 337.58 कोटी रुपये इतकं झालं. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालत असून आत्तापर्यंत 700 कोटी हून अधिक कमाई केली

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.