Anju Mahendru Birthday: अंजू स्कर्ट घालते म्हणून राजेश खन्ना व्हायचे नाराज, ‘मूडी काका’ आणि अंजूचं 6 वर्षांचं नातं ‘असं’ तुटलं!
Anju Mahendru Birthday : राजेश खन्ना आणि अंजू यांचं नातं खास होतं. त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती. दोघेही समजदार होते, पण राजेश खन्ना जरा मुडी आणि पुराणमतवादी होते. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचे.

मुंबई : ‘रोमान्स’ला एक वेगळी ओळख देणारा 80 च्या दशकातला हिंदी चित्रपटातला सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्याकडे पाहिलं जातं. बॉलिवूडमध्ये जेव्हा दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर या तीन बड्या लोकांचा दबदबा होता तेव्हा राजेश खन्ना टॅलेंट हंट स्पर्धा जिंकून चित्रपटसृष्टीत आले होते. त्यांचं वेगळेपण आणि टॅलेंट त्यांनी आयुष्यभर चाहत्यांना दाखवून दिलं. आपल्या खास रोमँटिक अंदाजाने त्यांनी सिनेसृष्टीतल्या टॉपच्या अभिनेत्रींना घायाळ केलं. लाखो तरुणींच्या ‘दिलाची धडकन’ म्हणून राजेश खन्ना यांना वेगळी ओळख मिळाली. त्यांना ‘काका’ या टोपन नावाने सगळा भारत ओळखायचा. पण काका जरा मूडी स्वभावाचे होते. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे त्यांचं एका व्यक्तीशी ‘खास’ जमायचं कारण ते नातंच एवढं खास होतं…! काकांशी अतिशय जवळची मैत्रीण अंजू महेंद्रू (Anju Mahendroo)… आज त्यांचा वाढदिवस… आज अंजू 76 वर्षांच्या झाल्या आहेत. चला तर मग, आज आपण त्यांच्या नात्याविषयी जाणून घेऊयात…!
राजेश खन्ना आणि अंजू यांचं नातं खास होतं. त्यांच्यात खूप चांगली मैत्री होती. दोघेही समजदार होते, पण राजेश खन्ना जरा मुडी आणि पुराणमतवादी होते. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचे. एका मुलाखतीत अंजू यांनी राजेश खन्ना यांच्याविषयी बोलताना त्यांच्या आवडणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टींविषयी खुलासा केला होता. मी शॉर्ट स्कर्ट घातलेलं राजेश खन्ना यांना आवडायचं नाही, ते नाराज व्हायचे, असा गौप्यस्फोट अंजू महेंद्रू यांनी एका मुलाखतीत बोलताना केला होता.
जेव्हा अंजूने राजेश खन्ना यांचं लग्नाचं प्रपोजल नाकारलं!
एव्हाना खूप वर्षांपूर्वीची मैत्री आणि त्यानंतर झालेलं प्रेम काका-अंजूला एका वेगळ्या वळणावर घेऊन आलं होतं. आयुष्यातलं हे फार महत्त्वाचं वळण होतं, ते म्हणजे लग्नाचं.. पण राजेश खन्ना यांच्या मुडी आणि पुराणमतवादी स्वभावामुळे त्यांच्या लग्नाचं प्रपोजल अंजूने नम्रपणे नाकारलं. राजेश खन्ना यांना मॉर्डन मुलीही आवडयच्या पण अंजूने शॉर्ट स्कर्ट घातलेलं मात्र आवडायचं नाही. ते अंजू यांना तू साडी का घालत नाहीस असं विचारायचे. तर साडी घातल्यावर मात्र तू भारतीय महिला लूकला प्रोजेक्ट करतीय, असं तुला वाटत नाही का? असा उलटप्रश्नही विचारायचे.
स्टारडम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अंजू सांगतात, “राजेश खन्ना यांच्या अशा मूडी वागण्याचा मला त्रास होऊ लागला. पुढे त्यांच्याशी वेळ घालवणं, त्यांच्या सोबत राहणं मला त्रासदायक वाटू लागलं. त्यांचा मूड ठीक नसेल तर ते लगेच इरीटेट व्हायचे”
अंजू आणि काका एकमेकांच्या कसे जवळ आले?
अंजू महेंद्रू आणि राजेश खन्ना 1966 मध्ये एकमेकांच्या खूप जवळ आले. अंजू आणि राजेश खन्ना यांच्या मैत्रीचं नंतर प्रेमात रूपांतर झालं. काकांची मैत्रीण झाल्यानंतर अंजू राजेश खन्नांबद्दल बोलणं टाळू लागल्या. राजेश खन्ना यांचं त्यांच्यावर खूप प्रेम होते. अशा परिस्थितीत दोघेही 6 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. 1971 मध्ये जेव्हा राजेश खन्ना यांनी अंजू यांना लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा त्यांचा प्रस्ताव अंजूने नम्रपणे नाकारला. मात्र, अंजूच्या आईलाही राजेश खन्ना यांना जावई म्हणून पाहायचे होते. पण अंजूला हे नको होतं.
अशा स्थितीत राजेश खन्ना यांनी रागाच्या भरात अंजूसोबतचं 6 वर्षांचं नातं तोडलं. आपल्या या नात्यात राजेश खन्ना म्हणतील तसंच मला ऐकावं लागत असल्याचं अंजूने त्यावेळी सांगितलं. राजेश खन्ना यांना मला काम करू द्यायचे नव्हते, त्यामुळे मोठ मोठे प्रोजेक्ट मला सोडून द्यावे लागले. अशा परिस्थितीत या नात्यात मला जुळवून घेता आलं नाही. अंजूपासून वेगळे झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी 1973 मध्ये डिंपल कपाडियासोबत लग्न केलं. राजेश खन्नांना हिंदी सिनेमात सगळ्यांत पहिल्यांदा सुपरस्टारचा किताब मिळाला.
संबंधित बातम्या-