“किमान वरचेवर तरी स्पर्श करू दे..”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

"इथे तर कॉम्प्रमाइज करावं लागतंच. इंडस्ट्रीत सहजच काम मिळत नाही. आम्ही आतापर्यंत बऱ्याच लोकांना लाँच केलं आहे", असं संबंधित व्यक्तीने अंकितला सांगितलं. त्या व्यक्तीने टीव्ही इंडस्ट्रीतील काही मोठ्या लोकांची नावंही घेतल्याचं अंकित म्हणाला.

किमान वरचेवर तरी स्पर्श करू दे.., 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
Ankit GuptaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 1:48 PM

मुंबई: बॉलिवूड असो किंवा मग टेलिव्हिजन.. अनेकदा इंडस्ट्रीतील विविध कलाकार कास्टिंग काऊचबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. काहींनी याविरोधात आवाज उठवला तर काहींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. बिग बॉस फेम अभिनेता अंकित गुप्ताने त्याच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. काम मिळवण्यासाठी तडजोड करावं लागेल, असं त्याला सांगण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकित याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “इथे तर कॉम्प्रमाइज करावं लागतंच. इंडस्ट्रीत सहजच काम मिळत नाही. आम्ही आतापर्यंत बऱ्याच लोकांना लाँच केलं आहे”, असं संबंधित व्यक्तीने अंकितला सांगितलं. त्या व्यक्तीने टीव्ही इंडस्ट्रीतील काही मोठ्या लोकांची नावंही घेतल्याचं अंकित म्हणाला.

अंकितने कास्टिंग काऊचचा विरोध करत तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. “मला पुरुषांमध्ये रस नाही आणि असला तरी मी हे सर्व करणार नाही, असं मी त्याला म्हणालो. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट अनुभव होता”, असं अंकितने सांगितलं. त्याच्या नकारानंतरही कास्टिंग काऊच करणाऱ्या व्यक्तीने त्याला वरचेवर स्पर्श करण्याची परवानगी मागितली. “ठीक आहे, तुला काही करायचं नसेल तर किमान मला स्पर्श करू दे, वरचेवर का होईना”, अशी ती व्यक्ती अंकितला म्हणाली. हे ऐकून अंकितला धक्काच बसला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ankit Gupta (@6_ankitgupta)

अंकित गुप्ता बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये झळकला होता. तो लवकरच ‘जुनूनियत’ या म्युझिकल ड्रामा सीरिजमध्ये झळकणार आहे. बिग बॉसच्या घरात असताना अंकित आणि प्रियांका चहर चौधरी यांची मैत्री विशेष चर्चेत होती. बिग बॉसच्या घरातील ही सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी जोडी होती. अंकित बिग बॉसच्या घरात जवळपास 80 दिवस राहिला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.