विकी जैनला अंकिता लोखंडे देणार घटस्फोट? थेट म्हणाली “मला तुझ्यासोबत घरी..”

‘बिग बॉस 17’च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू पहायला मिळतेय. या दोघांमध्ये अनेकदा क्षुल्लक कारणांवरून भांडणं झाली आहेत. आता मात्र अंकिता थेट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे. नेमकं काय घडलं, ते वाचा..

विकी जैनला अंकिता लोखंडे देणार घटस्फोट? थेट म्हणाली मला तुझ्यासोबत घरी..
Vicky Jain and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 12:10 PM

मुंबई : 21 डिसेंबर 2023 | बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांशी भांडताना दिसतात. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी नेटकऱ्यांना ही आदर्श जोडी वाटली होती. मात्र आता दररोजची भांडणं पाहून अंकिता-विकी लवकरच विभक्त होणार की काय, असाही अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा दोघांमध्ये भांडण झाल्याचं पहायला मिळालं. आयेशा खानने विकीला त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना विकीने मस्करी केली आणि विवाहित पुरुषाच्या समस्या सांगण्यास सुरुवात केली.

अंकिता लोखंडे-विकी जैन घेणार घटस्फोट?

आयेशा आणि विकी यांच्यातील संवादाने अंकिताला विचलित झाली. वैवाहिक आयुष्याबद्दल नकारात्मक बोलताना पाहून तिने पती विकीला त्याचं कारण विचारलं. त्यावर विकी अंकिताला म्हणतो, “मी वास्तवात कधीच सांगू शकत नाही की मला काय वाटतंय? विवाहित आणि खासकरून पुरुष या परिस्थितीचा सामना करतात. ते कधीच हे खरं सांगू शकत नाहीत की ते कोणत्या परिस्थितीचा सामना करत आहेत किंवा त्यांना कोणता त्रास होतोय?” विकीचं हे उत्तर ऐकून अंकिता भडकते आणि थेट घटस्फोटाबद्दल बोलते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

“जर तुला इतकाच त्रास होत असेल तर तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊया, मला तुझ्यासोबत पुन्हा घरी जायचं नाहीये”, असं ती रागाच्या भरात म्हणते. विकीशी घटस्फोटाबद्दल बोलल्यानंतर अंकिता स्वत: भावूक होते. आयेशासोबत ती पुढे म्हणते, “मला माहितीये की विकी माझ्यावर प्रेम करतो, पण तो मला ते देण्यास असमर्थ आहे जे मला खरंच हवंय. कधी कधी त्याचं माझ्यावर खूप नियंत्रण असल्याचं मला वाटतं. हे मी अनुभवलंय. मी जेव्हा कधी एखाद्या पुरुष स्पर्धकाशी भांडण करते, तेव्हा तो मला कशा पद्धतीने थांबवतो.”

अंकिता आणि विकी यांच्यात भांडण झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या दोघांनी डिसेंबर 2021 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांनी बिग बॉसच्या घरात एकत्र एण्ट्री केली. तेव्हापासून या दोघांमध्ये तू तू- मैं मैं सुरू आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.