अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा मुळे सुशांत सिंग राजपूत – अंकिता लोखंडे यांच्यात व्हायचे वाद

Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत - अंकिता लोखंडे यांच्यात होणाऱ्या वादाला अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा होत्या जबाबदार? मोठं सत्य अखेर समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत - अंकिता यांच्यात होणाऱ्या वादाची चर्चा...

अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा मुळे सुशांत सिंग राजपूत - अंकिता लोखंडे यांच्यात व्हायचे वाद
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 10:11 AM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 2021 मध्ये उद्योजक विकी जैन याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर देखील अंकिता एक्स-बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला विसरु शकलेली नाही. अंकिता सतत सुशांत याच्या आठवणींमध्ये रमताना दिसते. अंकिता सध्या ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. नुकताच अंकिता हिने अभिषेक कुमार याला सुशांत याच्यासोबत होणाऱ्या वादाबद्दल सांगितलं. अभिनेत्री अनुष्का चोप्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासोबत सिनेमात दिलेल्या किसिंग सीनमुळे सुशांत – अंकिता यांच्यामध्ये वाद झाले होते.

अंकिता म्हणाली, ‘जेव्हा सुशांत याचा पहिला ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा आम्ही सिनेमा पाहाण्यासाठी गेलो होतो. सुशांत याने पूर्ण यशराज हॉल बूक केला होता. हॉलमध्ये फक्त आम्ही दोघेत होतो. कारण त्याला माहिती होतं की, मला राग येईल. मी पूर्ण सिनेमा पाहिला. सुशांत तेथून पळून गेला होता.’

हे सुद्धा वाचा

‘सिनेमात परिणीती सोबत सुशांतने दिलेले किसिंग सीन मला आवडले नव्हते. घरी गेल्यानंतर मी प्रचंड रडली होती. सुशांत सुद्धा माझ्यासोबत प्रचंड रडला होता. म्हणाला, मला माफ कर अंकू… यापुढे कधीही नाही करणार…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा मी स्वतःला सांभाळलं. आपल्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या तरुणीसोबत पाहाणं सोपं नाही. पण कोणाच्या करियरमध्ये आपण अडथळा आणू शकत नाही. ‘पीके’ सिनेमात सुशांत याला अनुष्कासोबत पाहून मला चक्कर आली होती.’ एवढंच नाही तर, ‘धोनी’ सिनेमापर्यंत सुशांत आणि अंकिता एकत्र होते. असं देखील अंकिता म्हणाली.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या सेटवर अंकिता आणि विकी यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दरम्यान, सुशांत याच्या मृत्यूनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. 2020 मध्ये सुशांत याने स्वतःचं आयुष्य संपवलं. आज सुशांत जिवंत नसला तरी, त्याच्या आठवणी आजही चाहत्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.