Ankita Lokhande | ‘पतीच्या निधनानंतर का हसतायत?’; अंकिता लोखंडेची आई ट्रोल, पहा व्हिडीओ

'त्या का हसत आहेत? त्यांच्या पतीचं निधन झालं आहे आणि त्या हसतायत', असं एकाने म्हटलंय. तर 'पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील महिला का हसत आहेत', असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे.

Ankita Lokhande | 'पतीच्या निधनानंतर का हसतायत?'; अंकिता लोखंडेची आई ट्रोल, पहा व्हिडीओ
Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 1:10 PM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवार अंत्यसंस्कार पार पडले. सोशल मीडियावर अंकिता आणि तिच्या कुटुंबीयांचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. यातील काही व्हिडीओमध्ये अंकिता पूर्णपणे खचल्याचं पहायला मिळत आहे. तर एका व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी अंकिताच्या आईला ट्रोल केलं आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताची आई हसताना दिसत असल्याने नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये अंकिता, तिचा पती विकी जैन आणि तिच्या बाजूला आई दिसत आहे. शशिकांत लोखंडे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून सर्व कुटुंबीय तिथे जमले आहेत. मात्र यावेळी पार्थिवाकडे पाहताना अंकिताच्या आईच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पहायला मिळत आहे. अंकिता मधेच तिच्या आईला काहीतरी विचारते आणि त्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळतं. हे पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देते आहेत.

हे सुद्धा वाचा

‘त्या का हसत आहेत? त्यांच्या पतीचं निधन झालं आहे आणि त्या हसतायत’, असं एकाने म्हटलंय. तर ‘पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील महिला का हसत आहेत’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. अशा कठीण वेळी कुटुंबीयांच्या खासगी क्षणांमध्ये अडथळा आणू नका, असाही सल्ला काहींनी पापाराझींना दिला आहे.

वडिलांच्या निधनानंतर सोमवारी अंकिताने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिच्या वडिलांच्या शोकसभेबद्दलची माहिती देण्यात आली आहे. वडिलांच्या फोटोसोबत तिने लिहिलं आहे, ‘शोकसभा, शशिकांत लोखंडे.. तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल. 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत.’ मालाड पश्चिम याठिकाणी ही शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. शशिकांत लोखंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मात्र त्यांचं निधन नेमकं कशामुळे झालं, याबद्दलची माहिती अद्याप स्पष्ट नाही. अंकिता किंवा विकी जैन यांनी त्यावर अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.