AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूतबद्दल अखेर खुलेपणाने व्यक्त झाला अंकिता लोखंडेचा पती; पत्नीसोबतच्या नात्याविषयी म्हणाला..

सुशांतच्या निधनानंतर अंकितालाही बऱ्याच घडामोडींचा सामना करावा लागला होता. माध्यमांनाही तिने काही मुलाखती दिल्या होत्या आणि सुशांतच्या कुटुंबीयांचीही तिने भेट घेतली होती.

सुशांत सिंह राजपूतबद्दल अखेर खुलेपणाने व्यक्त झाला अंकिता लोखंडेचा पती; पत्नीसोबतच्या नात्याविषयी म्हणाला..
अंकिता लोखंडेच्या पतीने सांगितला सुशांतच्या निधनानंतरच्या काळाचा संघर्षImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 8:38 AM

मुंबई: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांचं नातं जगजाहीर होतं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर सुशांतचं नाव अभिनेत्री रिया चक्रवर्तीशी जोडलं गेलं. तर अंकिताने डिसेंबर 2021 मध्ये बॉयफ्रेंड विकी जैनशी लग्न केलं. अंकिताच्या लग्नाच्या एक वर्षापूर्वी सुशांत मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. आता अंकिताचा पती विकी त्याच्या रिलेशनशिपबद्दल आणि सुशांतच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

“मला काय करायचं होतं हे मला नीट ठाऊक होतं. मी एखाद्याला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळण्यावर विश्वास ठेवतो. आयुष्यात तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा काही परिस्थितींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. माझा नेहमीच असा विश्वास आहे की जर तुम्ही एकमेकांना कमिटमेंट दिली असेल तर तुम्ही आपोआप एक टीम बनता. त्यामुळे तिच्यासोबत त्यावेळी जे काही घडत होतं, ते फक्त तिचंच नव्हतं. मी सुद्धा तिच्या पाठिशी तिथे खंबीरपणे उभा होतो”, असं विकी म्हणाला.

हे सुद्धा वाचा

यावेळी विकीने अंकिताचंही कौतुक केलं. घडलेल्या परिस्थितीबद्दल एकमेकांशी प्रामाणिकपणे चर्चा करायची असं दोघांनी ठरवलं होतं आणि तेच गरजेचं होतं असं विकीने सांगितलं. एखादं संकट आलं तर मी पळून जाणारा नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.

सुशांतच्या निधनानंतर अंकितालाही बऱ्याच घडामोडींचा सामना करावा लागला होता. माध्यमांनाही तिने काही मुलाखती दिल्या होत्या आणि सुशांतच्या कुटुंबीयांचीही तिने भेट घेतली होती. “त्या कठीण काळात आम्ही एकमेकांशी अजिबात भांडलो नाही. उलट आमच्यात स्पष्ट संवाद होता आणि आम्ही दोघं एक टीम असल्याप्रमाणे एकमेकांची साथ देत होतो,” असं विकीने सांगितलं.

14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला होता. मात्र सुशांतच्या निधनानंतर ईडी आणि एनसीबीने आर्थिक आणि ड्रग्जच्या अँगलने तपास केला. याप्रकरणी बॉलिवूडमधल्या बऱ्याच अभिनेत्रींची चौकशी झाली होती. तर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना पोलिसांनी अटक केली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.