“मी तर त्याच्या अंत्यविधीलाही..”; सुशांतबद्दल बोलताना अंकिता पुन्हा भावूक

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे पवित्र रिश्ता मालिकेत काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. आता बिग बॉसच्या घरात अंकिता सुशांतला आठवून भावूक झाल्याचं पहायला मिळालं. मुनव्वर फारुकीनेही तिला प्रश्न विचारला.

मी तर त्याच्या अंत्यविधीलाही..; सुशांतबद्दल बोलताना अंकिता पुन्हा भावूक
Sushant and AnkitaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 9:27 AM

मुंबई : 21 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अनेकदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिता पुन्हा एकदा सुशांतबद्दल बोलताना दिसली. मुनव्वर फारुकीने हृदयभंगावर एक शायरी सादर केली. ही शायरी ऐकून अंकिताला सुशांतची आठवण आली. ती मुनव्वरला म्हणते, “अशा गोष्टी बोलत जाऊ नकोस, त्यांचा खूप वाईट परिणाम होतो. पण तू जे म्हणालास ते मला आवडलं.” असं म्हटल्यानंतर ती सुशांतच्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील ‘कौन तुझे’ हे गाणं गुणगुणू लागते. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुशांतने क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची भूमिका साकारली होती. अंकिता आणि सुशांत जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.

सुशांतच्या आठवणींना उजाळा

सुशांतच्या आठवणीत अंकिता मुनव्वरला पुढे म्हणते, “तो खूप चांगला माणूस होता. तो होता असं कधी मी म्हणते तेव्हा मला खूप वेगळंच वाटतं. आता तरी सगळं ठीक आहे, सगळं नॉर्मल झालं आहे. सुशांत विकीचाही चांगला मित्र होता. तो या जगात नाही, हे जेव्हा मला समजलं तेव्हाची भावना सर्वांत वाईट होती.” हे ऐकल्यानंतर मुनव्वर अंकिताला सुशांतच्या निधनाविषयी विचारतो. त्यावर ती पुढे म्हणते, “मला आता त्याविषयी बोलायचं नाहीये आणि मला तुला काहीच सांगायचं नाही (हसते).”

सुशांतच्या अंत्यविधीला का गेली नाही?

“लोकांचे वेगवेगळे व्हर्जन आहेत. सर्वांची वेगळी मतं आहेत, पण तू अशा व्यक्तींपैकी एक आहेस, जिला नेमकं काय ते माहीत आहे”, असं मुनव्वर अंकिताला म्हणतो. तेव्हा अंकिता असं स्पष्ट करते की ती सुशांतच्या अंत्यविधीला जाऊ शकली नव्हती. “मी तर त्याच्या अंत्यविधीलाही गेले नाही. मी जाऊच शकले नाही. मी त्याला असं पाहू शकत नाही, असं मला वाटलं होतं. मला ते पाहायचंच नव्हतं. विकी मला म्हणाला होता की तू जाऊन ये. मी त्याला नकार दिला. मी सुशांतला असं कसं पाहू शकते? मी माझ्या आयुष्यात तसे क्षण कधीच अनुभवले नव्हते”, असं अंकिता सांगते.

हे सुद्धा वाचा

“मी पहिल्यांदा माझ्या वडिलांनाच असं पाहिलं होतं. एखाद्या व्यक्तीचं जाणं काय असतं, हे तेव्हा जाणवलं होतं. माझे वडील खूप.. मिस यू डॅडी. मी वडिलांना सारखं म्हणायचे की, पापा बिग बॉस.. (रडू कोसळतं). या गोष्टी आठवल्या की खूप त्रास होतो”, हे सांगताना अंकिताला अश्रू अनावर होतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.