अंकितावर विकीने हात उचलण्याचा केला प्रयत्न? व्हिडीओ पाहून आई म्हणाली “हे खूप चुकीचं”

अंकिता आणि विकी या दोघांमध्ये बिग बॉसच्या घरात अनेकदा भांडणं झाल्याची पहायला मिळाली. मात्र नुकताच एक असा व्हिडीओ नेटकऱ्यांसमोर आला, ज्यामध्ये विकी अंकितावर हाच उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यावर आता अंकिता लोखंडेची आई वंदना यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अंकितावर विकीने हात उचलण्याचा केला प्रयत्न? व्हिडीओ पाहून आई म्हणाली हे खूप चुकीचं
Ankita Lokhande with motherImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 8:54 AM

मुंबई : 28 डिसेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये सतत भांडणं होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये विकीने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र त्याने असं केलं नसल्याचं अंकिताने स्पष्ट केलं. आता अंकिताच्या आईने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अंकितासोबत असं काही घडलंच नसल्याचं तिच्या आईने म्हटलंय. त्यामुळे मुलीचं लग्न वाचवण्यासाठी आई खोटं बोलतेय, असा आरोप नेटकरी करतायत.

पापाराझींशी बोलताना अंकिताची आई म्हणाली, “बिलकुल चुकीचं होतं ते. कारण मी विकीला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. तो माझ्यासोबत राहिला आहे. त्यामुळे तो कसा आहे, हे मला नीट माहीत आहे. हे खूप चुकीचं आहे. असं काहीच घडलं नव्हतं. कारण दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे.” या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘एक आई तिच्या मुलीचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘लोकांनी सर्व पाहिलंय, खोटं बोलू नका’, असं दुसऱ्याने म्हटलंय. विकीने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केला होता, हे सर्व रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट दिसतंय, असंही अनेकांनी लिहिलं आहे. अंकिताची आई विकीची चूक लपवण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

‘बिग बॉस 17’मधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये विकी जैन त्याचा हात उचलतो आणि अंकिता घाबरते. त्यामुळे त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, असं नेटकरी म्हणत आहेत. अंकिता आणि विकी दोघं बेडवर बसलेले असतात. त्याचवेळी रागाच्या भरात विकी त्याचा हात उचलतो आणि ते पाहून अंकिता दचकते. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनीही विकीवर आरोप केला आहे. सहस्पर्धक अभिषेक कुमार या व्हिडीओत म्हणताना दिसतोय, “आम्ही आता हे काय पाहिलं? तू अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केलास, तुझ्या पत्नीवर? विकी जैन त्याच्या पत्नीला मारतो. सर्वांनी पहा त्याने अंकिताला मारलं. अरुण भाई सर्वांना हे सांग.”

पहा व्हिडीओ

अंकिताच्या आईच्या आधी घरातून बाहेर पडलेली स्पर्धक ऐश्वर्या शर्मानेही यावर तिची प्रतिक्रिया दिली होती. “नेमकं काय घडलं होतं, हे मलाही नीट माहीत नाही. नील आणि अभिषेक त्याबद्दल बोलत होते. विकीने अंकितावर हाच उचलण्याचा प्रयत्न केला, असं अभिषेक सांगत होता. हे ऐकून मलाही धक्का बसला होता. पण ही त्या दोघांमधील गोष्ट आहे. तरीही हे चुकीचंच आहे”, असं ती म्हणाली होती. तर विकी जैनने त्याच्या बचावात म्हटलं होतं की त्याने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केला नव्हता. ब्लँकेट बाजूला करण्यासाठी त्याने हात वर केला होता, असं तो म्हणाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.