Ankita Lokhande झाली बेरोजगार? सांगितलं काम न मिळण्यामागचं कारण

अंकिताला कोणतेच ऑफर्स मिळत नाहीयेत, हे ऐकून चाहत्यांनाही नवल वाटत आहे. कारण टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिचे चांगले कनेक्शन्स आहेत.

Ankita Lokhande झाली बेरोजगार? सांगितलं काम न मिळण्यामागचं कारण
Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 2:09 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची धमाकेदार सुरुवात करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडेनं इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र आता अंकिता बेरोजगार झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अंकिताने स्वत:च सांगितलं की तिला काम मिळत नाहीये. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

अंकिताने सांगितलं की तिला ऑफर्स मिळत नाहीयेत. यामागच कारणंही तिने स्पष्ट केलं. अंकिताने पती विक्की जैनसोबत नुकतीच एका वेबसाइटला मुलाखत दिली. या मुलाखतीत अंकिता तिच्या करिअरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मणिकर्णिका या चित्रपटानंतर माझ्या हातात कोणतीच तलवार आली नाही आणि खरं सांगायचं झालं तर माझा इंडस्ट्रीत कोणी गॉडफादर नाही. मी प्रतिभावान आहे, हे मला माहीत आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझा कोणी गॉडफादर नाही”, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

ऑफर्सना नाकारण्याबाबत ती पुढे म्हणाली, “नकार देण्यासाठी तुमच्याकडे आधी ऑफर्स तर आले पाहिजेत. मार्केट आता बरंच बदललं आहे. काहीजण म्हणतात की त्यांना चांगले, मनासारखे ऑफर्स मिळाले नाही म्हणून काम केलं नाही. पण माझ्याबाबत असं काहीच झालं नाही. मला कोणतेच ऑफर्स मिळाले नाहीत, ज्यांना मी नकार करू शकेन. मी समोर जाऊन काम मागू शकत नाही. कारण मी तशी नाही.”

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अंकिता व्यावसायिक विक्की जैनला डेट करू लागली. गेल्या वर्षी अंकिता आणि विक्कीने लग्नगाठ बांधली.

अंकिताला कोणतेच ऑफर्स मिळत नाहीयेत, हे ऐकून चाहत्यांनाही नवल वाटत आहे. कारण टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही तिचे चांगले कनेक्शन्स आहेत. असं असूनही तिला काम मिळत नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अंकिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे चार दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.