Ankita Lokhande | सुशांत सिंह राजपूतनंतर पुन्हा प्रेमात पडण्याविषयी काय म्हणाली अंकिता लोखंडे?

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सहा वर्षे सुशांतला डेट केल्यानंतर अंकिताचं त्याच्याशी ब्रेकअप झालं होतं. सुशांतनंतर आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम कसं आलं, याविषयीही तिने सांगितलं.

Ankita Lokhande | सुशांत सिंह राजपूतनंतर पुन्हा प्रेमात पडण्याविषयी काय म्हणाली अंकिता लोखंडे?
Ankita Lokhande and Sushant Singh RajputImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:38 AM

मुंबई: अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नातं सर्वश्रुत होतं. त्यामुळे जेव्हा 2020 मध्ये सुशांतचं निधन झालं, तेव्हा या दोघांचं नातं पुन्हा जोरदार चर्चेत आलं होतं. त्यावेळी अंकिता बिझनेसमॅन विकी जैनला डेट करत होती. डिसेंबर 2021 मध्ये अंकिताने त्याच्याशी लग्न केलं. मात्र सुशांतच्या निधनाचा काळ या दोघांच्या नात्यासाठीही बऱ्याच चढउतारांचा होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सहा वर्षे सुशांतला डेट केल्यानंतर अंकिताचं त्याच्याशी ब्रेकअप झालं होतं. सुशांतनंतर आयुष्यात पुन्हा नवीन प्रेम कसं आलं, याविषयीही तिने सांगितलं.

अंकिताची प्रतिक्रिया

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, “जे काही घडलं होतं आणि त्याच्याही दोन वर्षांनंतर माझा प्रेमावरून कधीच विश्वास उडाला नव्हता. माझ्या आयुष्यात प्रेम पुन्हा येईल आणि त्यासाठी मी बनली आहे, असा आत्मविश्वास मला होता. माझ्यासाठी एखादी व्यक्ती नक्कीच असेल जी माझी स्वप्नं पूर्ण करेल, जो माझ्याशी लग्न करेल, असं मला नेहमीच वाटायचं. मी प्रेमाला कधीच नकार देऊ शकली नाही. माझ्यासाठी एखादी व्यक्ती नक्कीच आहे, यावर मला कायम विश्वास होता.”

सुशांतविषयी काय म्हणाला अंकिताचा पती?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताचा पती विकी जैनसुद्धा त्यांच्या नात्याविषयी आणि सुशांतविषयी व्यक्त झाला. “आयुष्यात तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा काही परिस्थितींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. माझा नेहमीच असा विश्वास आहे की जर तुम्ही एकमेकांना कमिटमेंट दिली असेल तर तुम्ही आपोआप एक टीम बनता. त्यामुळे तिच्यासोबत त्यावेळी जे काही घडत होतं, ते फक्त तिचंच नव्हतं. मी सुद्धा तिच्या पाठिशी तिथे खंबीरपणे उभा होतो”, असं विकी म्हणाला.

हे सुद्धा वाचा

सुशांतच्या निधनानंतर अंकितालाही बऱ्याच घडामोडींचा सामना करावा लागला होता. माध्यमांनाही तिने काही मुलाखती दिल्या होत्या आणि सुशांतच्या कुटुंबीयांचीही तिने भेट घेतली होती. “सुशांतच्या निधनानंतर विविध वृत्त समोर येत होत्या आणि त्यात सर्वच गोष्टी सांगितल्या जात नव्हत्या. त्यावेळी अंकिताकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. केवळ यासाठी नाही की सुशांत आणि ती रिलेशनशिपमध्ये होते. पण एक माणूस म्हणूनही तिने ते करणं गरजेचं होतं”, असं विकीने स्पष्ट केलं.

अंकिता आणि सुशांत ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2016 मध्ये त्यांनी ब्रेकअप केलं. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.