दिशा सालियानविषयी पहिल्यांदाच अंकिता लोखंडेची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाली?

सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी सरकार एसआयटी चौकशी करत आहे. डीआयजी रँकचे अधिकारी या SIT च्या कामाचं निरीक्षण करतील. आता बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या अंकिताने पहिल्यांदाच दिशाविषयी प्रतिक्रिया दिली.

दिशा सालियानविषयी पहिल्यांदाच अंकिता लोखंडेची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाली?
Disha Salian and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 9:10 AM

मुंबई : 2 जानेवारी 2024 | सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला. दिशाच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी आता SIT ची स्थापना करण्यात आली आहे. दिशाच्या मृत्यूच्या ठीक सात दिवसांनंतर 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. दिशाने सुशांतसोबतही काम केलं होतं. त्यामुळे या दोघांच्या निधनाने मोठा धक्का बसला होता. आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दिशा सालियानविषयी व्यक्त झाली. मुनव्वर फारुकीशी बोलताना अंकिताने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात सुशांतचा उल्लेख केला.

“बऱ्याच गोष्टींमुळे तो पूर्णपणे खचला होता. त्याच्या आयुष्यात हे सर्व घडत असताना मी त्याच्यासोबत नव्हते. त्याच्या निधनानंतर मला काही सुचतच नव्हतं. मी त्याच्यासोबत असले किंवा नसले तरी काही फरक पडत नव्हता. मी पूर्णपणे खचली होती”, असं अंकिता मुनव्वरला सांगते. हे ऐकल्यानंतर मुनव्वर तिला विचारतो, “सुशांतच्या मॅनेजरचं निधन त्याच्या निधनाच्या आधी झालं की नंतर?” त्यावर अंकिता म्हणते, “ती त्याची मॅनेजर नव्हती. तिने फक्त एकदा पाच ते सहा दिवसांसाठी सुशांतचं काम पाहिलं होतं, त्याला मॅनेज केलं होतं. पण ती त्याची मॅनेजर नव्हती.”

मुनव्वर अंकिताला सुशांतच्या कुटुंबीयांविषयीही प्रश्न विचारतो. “त्याचे कुटुंबीय बिहारचे आहेत का?” तेव्हा अंकिता पुढे सांगते, “नाही. त्याची एक बहीण अमेरिकेत असते तर दुसरी चंदीगढमध्ये आणि त्याचे वडील पाटणा किंवा दिल्लीत राहतात. त्याचे कुटुंबीय खूप शिकलेले आहेत. सर्वजण उच्चशिक्षित आहेत. सुशांतसुद्धा अभ्यासात खूप हुशात होता. कोणतंही गणित तो क्षणार्धात सोडवायचा. तो आयआयटीचा विद्यार्थी होता. भारतात आयआयटीमध्ये तो सातव्या क्रमांकावर होता.”

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन केली गेली. त्यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी अनेक आमदारांनी केली होती. डिसेंबर 2022 मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत उचलण्यात आला होता. तेव्हा शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सालियनच्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित केला होता आणि चौकशीची मागणी केली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.