‘बिग बॉस 17’च्या ग्रँड फिनालेआधी अंकिता लोखंडेला मोठा झटका; चाहत्यांच्या वोटिंगने पलटवला खेळ

अभिनेत्री अंकिता लोखंडेला अनेक सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असला तरी वोटिंगच्या बाबतीत तिला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ग्रँड फिनालेच्या आधी बिग बॉसचा खेळ पलटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंकिताच्या ऐवजी या स्पर्धकाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत.

'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेआधी अंकिता लोखंडेला मोठा झटका; चाहत्यांच्या वोटिंगने पलटवला खेळ
Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 10:07 AM

मुंबई : 19 जानेवारी 2024 | बिग बॉसचा 17 वा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या 28 जानेवारी रोजी या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सध्या शोमध्ये आठ स्पर्धक राहिले आहेत आणि या आठ जणांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. आठ स्पर्धकांपैकी मुनव्वर फारुखी, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार या चौघांना ‘ग्रँड फिनाले’मध्ये थेट एण्ट्री मिळाली आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये या चौघांच्या टीमने बाजी मारली होती. म्हणून त्यांना ‘तिकिट टू फिनाले’ मिळालं आहे. तर घरात अजूनही चार स्पर्धक असे आहेत, ज्यांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. बिग बॉसमधील या स्पर्धकांना सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटींकडूनही पाठिंबा मिळतोय. अशातच ग्रँड फिनालेच्या आधी एक नवा वोटिंग ट्रेंड समोर आला आहे. या ट्रेंडनुसार अंकिता लोखंडेला मोठा झटका बसला आहे.

यंदाच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी आयेशा खान, अंकिता लोखंडे, विकी जैन आणि ईशा मालवीय या चौघांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरातील प्रत्येक अपडेट देणाऱ्या एका फॅन क्लबने सोशल मीडियावर मतदान घेतलं आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी मतदान करत या आठवड्यात कोणत्या सदस्याला वाचवलं पाहिजे, त्याचा खुलासा केला आहे. या वोटिंगनुसार प्रेक्षकांना ग्रँड फिनालेमध्ये मुनव्वर आणि मन्नारा या दोघांना एकत्र पहायचं आहे.

हे सुद्धा वाचा

या वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉसच्या चाहत्यांना या आठवड्यात आयेशा खानला सुरक्षित करायचं आहे. आयेशाने वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली आहे. तिला सुरक्षित करण्यासाठी 34 टक्के चाहत्यांनी मतदान केलं आहे. हा आकडा अंकिता लोखंडे, विकी जैन आणि ईशा मालवीय यांच्यापेक्षा अधिक आहे. एकीकडे अंकिताला सेलिब्रिटींकडून भरपूर पाठिंबा मिळतोय. मात्र चाहत्यांना तिची खेळी फारशी आवडत नसल्याचं दिसून येतंय. अंकिताला वाचवण्यासाठी फक्त 24 टक्के मतं मिळाली आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विकी जैन आणि चौथ्या क्रमांकावर ईशा मालवीय आहे. त्यामुळे या आठवड्यात कोणता स्पर्धक सुरक्षित होणार आणि कोणावर एलिमिनेशनचं संकट कोसळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आतापर्यंत मुनव्वर फारुखी, अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडे या तिघांना तगडे स्पर्धक मानलं जात आहे. मात्र आता चाहत्यांची सर्वाधिक मतं आयेशा खानला मिळाल्याने ऐनवेळी बिग बॉसचा खेळ पलटणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.