आईसाठी काहीपण…, कोट्यवधींची संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
५०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम करूनही अभिनेता राहतोय भाड्याच्या घरात ; फक्त आईसाठी केलं असं काम... कारण जाणून तुम्हीही व्हाल भावुक
Anupam Kher : आपलं देखील स्वतःचं एक घर (dream home) असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ज्याठिकाणी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत राहू शकतो. पण घर खरेदी करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण अनेक व्यक्ती आहेत जे स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करु शकत नाहीत. आजही बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आज देखील भाड्याच्या घरात राहतात. काही अभिनेते कोट्यवधींची संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहतात.
एक गोष्ट अनेकांना थक्क करणारी आहे, ती म्हणजे ५०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम करुनही अभिनेते अनुपम खेर (anupam kher) आजही भाड्याच्या घरात राहतात. अनुपम खेर यांनी कधी खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तर कधी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांना पोट धरुन हासवण्याचा प्रयत्न केला.
पण गेल्या काही वर्षांपासून अनुपम खेर यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले, पण ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमातील त्यांची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. आज अनुपम खेर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. पण आजही ते मुंबई याठिकाणी भाड्याच्या घरात राहतात. (anupam kher mother)
We Indians want to have our own home in a place where we grew up. Happy 2 share, we have our 1st ever home in Shimla. Presented it to Mom.:) pic.twitter.com/KkutDLbuqK
— Anupam Kher (@AnupamPKher) March 26, 2017
आता अनुपम खेर खरेदी केलं आहे. अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर करत यामागचं कारण सांगितलं आहे. ‘आपल्या हिंदू लोकांची एक इच्छा असते, ती म्हणजे आपण ज्याठिकाणी लहानाचे मोठे झालो.. त्याठिकाणी आपलं स्वतःचं एक घर हवं. माझा जन्म शिमला येथे झाला. माझे वडील वन विभागात क्लार्क होते. पूर्ण आयुष्य आम्ही सरकारी क्वाटरमध्ये राहिलो. भाड्याच्या घरात राहिलो. त्यामुळे मी याठिकाणी जागा घेवू शकलो नाही.’
‘आज मी शिमला येथे एक घर खरेदी केलं आहे. ते घर मी माझ्या आईला देणार आहे.’ अशा भावना अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय त्यांचा आई देखील आनंदाने भावुक झाली आहे. त्या म्हणाल्या, अनुपम खेर यांचे वडील आज असते, तर त्यांना देखील प्रचंड आनंद झाला असता. मीडिया रिपोर्टनुसार, अनुपम खेर यांनी आईसाठी शिमला येथे चक्क ९ बेडरुम असलेलं घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. (anupam kher new home for mother)
67 वर्षीय अभिनेते अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाला ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. ‘हाइट’ आणि ‘कार्तिकेय 2’मध्येही त्यांना चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे. (anupam kher film)
शिवाय 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शिव शास्त्री बल्बोआ’ सिनेमात देखील अनुपम खेर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमात अनुपम खेर यांच्यासोबत नीना गुप्ता आणि शरीब हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.