Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वत:ला काश्मिरी हिंदू म्हणता अन्..’; श्रावणातील ‘त्या’ कृत्यामुळे अनुपम खेर यांच्यावर भडकले नेटकरी

अनुपम खेर हे लवकरच अनुराग बासू दिग्दर्शित 'मेट्रो इन डिनो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकना सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेखर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्या भूमिका आहेत.

'स्वत:ला काश्मिरी हिंदू म्हणता अन्..'; श्रावणातील 'त्या' कृत्यामुळे अनुपम खेर यांच्यावर भडकले नेटकरी
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 10:25 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडकपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर ते बऱ्यापैकी सक्रिय असतात आणि विविध फोटो, व्हिडीओंच्या माध्यमातून ते सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ते किचनमध्ये काहीतरी बनवताना दिसत आहेत. मात्र या व्हिडीओमुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणूनच नेटकऱ्यांनी अनुपम खेर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी तर त्यांच्या हिंदू असण्यावर प्रश्न उपस्थित केला.

अनुपम खेर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओत ते अंड्याची भुर्जी बनवताना दिसत आहेत. “आज अंड्याची भुर्जी स्वत:च्या हातांनी बनवून खाण्याची इच्छा झाली आहे”, असं ते या व्हिडीओत सांगतात. या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी अनुपम यांना ट्रोल केलं आहे. श्रावण महिन्यात अंड खाल्ल्याने त्यांना खरंखोटं सुनावत आहेत. ‘खोटे पंडितजी, श्रावण महिना सुरू आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘श्रावणात अंड? उफ्फ विराट हिंदू?’ असा उपरोधिक टोला दुसऱ्या युजरने लगावला. ‘श्रावणात अंडी खाऊन म्हणता की मी हिंदू आहे आणि ते सुद्धा काश्मिरी’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर हे लवकरच अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन डिनो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकना सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेखर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्या भूमिका आहेत. याशिवाय ते विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात ते जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

याशिवाय ते आणखी एका चित्रपटात रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘मी माझ्या 538 व्या प्रोजेक्टमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारत असल्याने मला खूप जास्त आनंद होत आहे. खरोखर मला पडद्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारण्यास मिळाल्याने मी स्वत:ला खूप जास्त भाग्यवान समजतो,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती.

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.