Aaliyah Kashyap | 22 व्या वर्षी साखरपुडा केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना अनुराग कश्यपच्या मुलीचं सडेतोड उत्तर

अनुराग कश्यपचा होणारा जावई शेन ग्रेगॉइर हा 23 वर्षांचा आहे. तो अमेरिकन उद्योजक आहे. आलियासोबतच शेनसुद्धा काही वेळा भारतात आला आहे. अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही व्लॉगर आहे.

Aaliyah Kashyap | 22 व्या वर्षी साखरपुडा केल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना अनुराग कश्यपच्या मुलीचं सडेतोड उत्तर
Anurag Kashyap daughterImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:01 PM

मुंबई : निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉइर याच्याशी तिने साखरपुडा केला असून दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आलियाने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र तिच्या साखरपुड्यावरून काहींनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. वयाच्या 22 वर्षी लग्नबंधनात अडकण्याच्या तिच्या निर्णयाची काहींनी खिल्ली उडवली. यावर आता आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या आलियाने नुकत्याच तिच्या एका व्लॉगमध्ये ट्रोलिंगचा उल्लेख केला. ती म्हणाली, “हे माझं आयुष्य आहे. साखरपुडा, लग्न या गोष्टींसाठी मी आता पूर्णपणे तयार आहे. किंबहुना आम्ही दोघं तयार आहोत. गेल्या बऱ्याच काळापासून आम्ही याविषयी बोलत आहोत. सहा महिन्यांपासून शेन आणि मी एकत्र राहतोय आणि गेल्या तीन वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेट करतोय. एखाद्या व्यक्तीबाबत तुम्हाला खात्री असते, तेव्हा तुम्ही निर्णय घेण्यात विलंब करत नाही. मला माहीत आहे की या नात्यात मी खूप खुश आहे आणि तोच माझा जोडीदार आहे.”

हे सुद्धा वाचा

लग्नाविषयी आलिया पुढे म्हणाली, “कमी वयात लग्न करण्याबद्दल जर लोक आमच्यावर राग व्यक्त करत असतील तर त्याने मला काही फरक पडत नाही. मला माहितीये की आमचं वय कमी आहे, पण आम्हाला खरंच त्याने काही फरक पडत नाही.” आलियाच्या होणाऱ्या पतीनेही या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. “हा एवढा मोठा विषय आहे असं मला वाटत नाही. मुळात यात कोणतीच समस्या नाही. या गोष्टीला इतकं मोठं करण हाच मूर्खपणा आहे”, असं शेन म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by aaliyah (@aaliyahkashyap)

“माझ्या मते वय महत्त्वाचं नाही, तुमचा समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. निर्णय घेताना तुम्ही किती समजूतदार आहात हे पाहिलं जातं. लग्न हा खूप मोठा निर्णय आहे. प्रत्येक 20 वर्षीय मुलीने लग्न केलं पाहिजे असं मी म्हणत नाही. पण माझ्यासाठी आताची वेळ मला योग्य वाटते. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे”, असं आलियाने सांगितलं.

शेन आणि आलिया हे पुढील दीड ते दोन वर्षांत लग्न करणार आहेत. अमेरिका आणि भारतात ते लवकरच साखरपुड्याच्या पार्टीचं आयोजन करणार आहेत. याविषयी माहिती दोघांनी व्लॉगद्वारे दिली. अनुराग कश्यपचा होणारा जावई शेन ग्रेगॉइर हा 23 वर्षांचा आहे. तो अमेरिकन उद्योजक आहे. आलियासोबतच शेनसुद्धा काही वेळा भारतात आला आहे. अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही व्लॉगर आहे. युट्यूबवर ती नेहमीच तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते. आलिया आणि शेनच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती.

Non Stop LIVE Update
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.