Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याला वर्सोवा पोलिस स्थानकातून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे.

Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 1:15 PM

मुंबई : बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याला वर्सोवा पोलिस स्थानकातून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला आहे. अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. या प्रकरणी अनुरागला 1 ऑक्टोबर रोजी, सकाळी 11 वाजता वर्सोवा पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहायचे आहे (Anurag Kashyap summoned by Mumbai Police in Payal ghosh Case).

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने पायलने (Payal Ghosh) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, तिला न्याय मिळेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले होते.

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायलने घोषन (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

रामदास आठवलेंसह पायलने घेतली राज्यपालांची भेट

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर काल (29 सप्टेंबर) रामदास आठवले, पायल घोष यांनी राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली. (Anurag Kashyap summoned by Mumbai Police in Payal ghosh Case)

‘राज्यपालांशी आम्ही जवळपास अर्धा तास चर्चा केली. पायल घोष यांच्यावर काही वर्षांपूर्वी अत्याचार झाला होता. त्याबाबत तिने ओशिवरा पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. मात्र, अद्याप अनुराग कश्यपची चौकशी झाली नाही. त्यामुळे मी यासंदर्भात राज्यपालांना निवेदन दिले आहे’, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल- राज्यपाल

‘तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू घाबरु नको, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’, असे आश्वासनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायलला दिले.

तसेच पायलला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी याबाबतही राज्यपालांशी चर्चा झाली. त्यावर, ‘मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत बोलतो. ते पायलला सुरक्षा देतील’, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

अनुरागने आरोप फेटाळले

‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की, स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात सामील करून घेतलेस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकेच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले गेले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत’, असे ट्विट करत अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) सगळे आरोप फेटाळून लावले होते.

(Anurag Kashyap summoned by Mumbai Police in Payal ghosh Case)

संबंधित बातम्या : 

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन

‘अनेक लग्न करुनही तो संतुष्ट झाला नाही’, कंगनाच्या आरोपांना अनुरागच्या दोन्ही पत्नींकडून प्रत्युत्तर

पायल-अनुराग वादात रामदास आठवलेंची उडी, पायल प्रकरणी गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.