ही लॅम्पशेड आहे का ? कान्समधील लूकवरून अनुष्का शर्मा झाली ट्रोल…
अभिनेत्री अनुष्का शर्माने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पदार्पण केले असून तिच्या पोशाखामुळे सध्या ट्रोल होत आहेत.
16 मे पासून सुरू झालेल्या 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आणखी एक भारतीय सेलिब्रिटी उपस्थित होती. अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) शुक्रवारी प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर-व्हाइट गाऊनमध्ये रेड कार्पेटवर पदार्पण केले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या डेब्युसाठी अनुष्काने ऑफ-शोल्डर रिचर्ड क्विन गाऊन परिधान केला होता. कान्स 2023 मध्ये एका पार्टीत सहभागी झालेल्या अनुष्काचे नवे फोटो समोर आले असून अनेकांना तिचा नवा ड्रेस काही फारसा आवडला नसल्याचे दिसून आले.
शनिवारी, अनुष्काने सोशल मीडियावर तिच्या कान्समधील लूकचे नवीन फोटो शेअर केले. यावेळी तिने पिंक कलरचा टॉप आणि काळ्या रंगाची झगमगीत पँट घातली होती. तिच्या सॅटिनच्या गुलाबी टॉपने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्या टॉपला मागच्या बाजूला ट्रेनसारखा केप होता. अनुष्काने केसांचा पोनीटेल लूक कॅरी करत मिनिमल मेकअप केला.
युजर्सनी केले अनुष्काला ट्रोल
अनुष्काच्या गुलाबी आणि काळ्या ड्रेसचे फोटो इंटरनेटवर शेअर झाल्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांना त्या ड्रेसची संकल्पना समजलीच नाही, मात्र काहींना तिचा हा लूक आवडल्याचे दिसून आले. काही युजर्सनी तर हा (गुलाबी) टॉप लॅम्पशेड असल्याचे म्हटले. एका युजरने तर सरळ हा एखाद्या लहान मुलाचा ड्रेस असल्याची कमेंट केली होती. काही युजर्सना हा लूक अतिशय confusing, गोंधळात टाकणारा वाटला. तर आणखी एका युजरने विचारलं की स्कर्ट तिने टॉप म्हणून वर का घातला आहे ?