Anushka Sharma : टीम इंडियाच्या खराब कामगिरीवरुन अनुष्का शर्मा पुन्हा ट्रोल

भारतीय टीमच्या खराब कामगिरीमुळे अनुष्का शर्मा ट्रोल. (Anushka Sharma trolls over Team India's poor performance)

Anushka Sharma : टीम इंडियाच्या खराब कामगिरीवरुन अनुष्का शर्मा पुन्हा ट्रोल
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 1:55 PM

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियानं नुकतच पार पडलेल्या कसोटीत खराब कामगिरी केली, त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या चाहत्यांनी अनुष्का शर्माला यासाठी जबाबदार ठरवण्यास सुरुवात केली. आता भारतीय टीमच्या खराब कामगिरीचं खापर अनुष्काच्या डोक्यावर फोडण्यात येत आहे. मात्र आता अनुष्काचे चाहते तिचं समर्थन करण्यासाठी पुढे आले आहेत.

खरं तर अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या गुलाबी बॉल टेस्टमध्ये भारतीय फलंदाजी अवघ्या 36 धावांवर थांबली, जो कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात कमी स्कोर आहे. पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळविल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला केवळ 90 धावांचं लक्ष्य देऊ शकली. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमनं 2 विकेट गमावून हा डाव जिंकला.

अनुष्काला चाहत्यांनी दिला पाठिंबा भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल केवळ विराट कोहली आणि अनुष्का शर्माच ट्रोल झाले नाही तर त्यांच्या मुलावरही आरोप करण्यात आले. ज्या मुलाचा अजून जन्मसुद्धा झालेला नाही. अनुष्काच्या चाहत्यांना ही गोष्ट बिलकूल आवडली नाही. लोकांनी अश्या ट्रोलर्सला खडे बोल सुनावले.

एवढंच नाही तर नेटकऱ्यांनी अनुष्कासोबतच तिच्या होणऱ्या बाळालाही ट्रोल केलं आहे.

एकीकडे पुन्हा एकदा अनुष्काला नेटकऱ्यांनी विनाकारण ट्रोल केलं तर दुसरीकडे असे काही लोक पुढे आले, ज्यांनी अनुष्काला पाठिंबा दिला आणि ट्रोलला चोख प्रत्युत्तर दिलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.