पालकांवर अश्लील विधान इंन्फ्लुएंसरला पडलं महागात, बलात्कार, खूनाच्या धमक्या, स्क्रिनशॉट पाहून व्हाल थक्क
पालकांवर अश्लील विधान केल्यामुळे महिला इंन्फ्लुएंसरला करावा लागतोय भयानक परिस्थितीचा सामना, विधानानंतर सतत बलात्कार आणि खूनाच्या धमक्या... सोशल मीडियावर स्क्रिनशॉट तुफान व्हायरल

सोशल मीडियावर इंन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा हिला आई – वडिलांवर अश्लील विधान करणं महागात पडलं आहे. सांगायचं झालं तर, समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वी मुखिजा यांनी पालकांवर अश्लाघ्य आणि अश्लील टिप्पण्या केल्या होत्या. त्यांनी केलेल्या विधानाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ज्यामुळे सर्वत्र वातावरण तापलं होतं. शिवाय प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचलं. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर अपूर्वाने सोशल मीडियावरील तिच्या सर्व पोस्ट डिलिट केल्या होत्या.
अखेर वाद शमल्यानंतर अपूर्वाने पुन्हा सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. तिने काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. सोशल मीडियावर पुन्हा पदार्पण करत अपूर्वा हिने आलेल्या धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. जे अत्यंत धक्कादायक आहेत.




सोशल मीडियावर अपूर्वा हिचे जवळपास 30 हजार फॉलोअर्स आहेत. पहिल्याच पोस्टमध्ये अपूर्वा हिने तिला आलेल्या बलात्कार आणि खूनच्या धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. वादग्रस्त प्रकरणानंतर अपूर्वा हिला अनेकांनी बलात्कार, जीवेमारणे आणि अॅसिड हल्ल्याची धमकी दिली आहे.
View this post on Instagram
अनेक धमक्यांचे स्क्रिनशॉट शेअर करत अपूर्वा कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘हे फक्त 1 टक्के आहे…’, सध्या अपूर्वाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘ट्रिगर वॉर्निंग : पोस्टमध्ये अॅसिड हल्ला, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकीचे स्क्रिनशॉट आहेत…’ पोस्ट पाहिल्यानंतर अपूर्वाच्या अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
अपूर्वाच्या पोस्टवर नेटकरी आता लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता सायबर पोलीस कुठे गेले आहेत?’, ‘कोणालाही अशा परिस्थितीचा सामना करायला नको…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘अपूर्वाने कोणताही गुन्हा केला नाही…’ असं म्हणत अनेकांनी अपूर्वाचं समर्थन केलं आहे.