ए. आर. रेहमान यांची किती आहे संपत्ती, पत्नी सायरा बानू यांनी किती मिळणार पोटगी?

AR Rahman And Saira Banu Divorce: फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील ए. आर. रेहमान यांची गडगंज संपत्ती, किती आहे गायकाची संपत्ती, घटस्फोटानंतर पत्नी सायरा बानू यांनी किती मिळणार पोटगी?

ए. आर. रेहमान यांची किती आहे संपत्ती, पत्नी सायरा बानू यांनी किती मिळणार पोटगी?
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 10:33 AM

AR Rahman And Saira Banu Divorce: बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांच्या खासगी आयुष्यात मोठं संकट आलं आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए आर रेहमान आणि सायरा बानू विभक्त होत आहे. ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर घटस्फोटाची घोषणा केली आहे. ए आर रेहमान यांचा घटस्फोट होत असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहे. अशात रेहमान यांची संपत्ती आणि पत्नीला किती पोटगी मिळणार? यांसारख्या अनेक चर्चा रंगल्या आहे.

ए आर रेहमान यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी गायलेली गाणी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोजा’ सिनेमासाठी ए आर रहमान यांना 25 हजार रुपये मिळाले होते. या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये देखील ए आर रेहमान यांनी स्वतःचं स्थान पक्क केलं.

लंडन आणि यूएसमध्ये ए आर रेहमान यांचे स्टुडिओ

ऑस्कर पुरस्कार विजेते हॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहेत. राज्यांमध्ये दौऱ्यांदरम्यान ए आर रेहमान त्यांच्या परदेशातील अपार्टमेंटमध्ये राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, रहमान यांच्या मालकीचे एक अपार्टमेंट आहे, ज्यात त्यांचा स्टुडिओ देखील आहे. एआर रहमानच्या वेबसाइटनुसार, मुंबई, लंडन आणि लॉस एंजेलिसमध्ये केएम म्युझिक स्टुडिओ नावाच्या अनेक स्टुडिओचे मालक आहेत.

महागड्या गाड्या…

ए आर रेहमान त्यांच्या कुटुंबासोबत आलिशान आयुष्य जगतात. त्यांच्याकडे आलिशान गाड्या आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत, ज्यात 93.87 लाख रुपयांची व्होल्वो एसयूव्ही, 1.08 कोटी रुपयांची जग्वार आणि 2.86 कोटी रुपयांची मर्सिडीज आहे. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, त्यांची एकूण संपत्ती $280 दशलक्ष आहे, म्हणजे अंदाजे 2100 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमातील एका गाण्यासाठी ए आर रेहमान तब्बल 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेतात. शिवाय लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्यासाठी ए आर रेहमान प्रत्येक तासासाठी 3 ते 5 कोटी मानधन घेतात. देशातील मोठ-मोठ्या शहरांमध्ये त्यांची संपत्ती आहे. पण घटस्फोटानंतर सायरा बानू यांना पोटगी म्हणून किती संपत्ती मिळेल याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली
'शिरसाटांच्या मताला महायुतीत...', शिंदेंच्या दोन मंत्र्यामध्येच जुंपली.
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'
'भाजप माझ्यासाठी लकी नव्हता, तिथे सगळे आमदार होतात पण...'.
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली
'वडिलांचा एकही अवयव शाबूत नाही, फक्त 3 हाडं', बापासाठी लेक ढसाढसा रडली.
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला
मतदारसंघातील मुलीवर अत्याचार अन् घटनेवर बोलताना खासदार ढसाढसा रडला.
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर
शास्त्रींकडून आरोपीच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर.
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला
'शिरसाटांचा संजय राजाराम राऊत होऊ नये बस...', भाजप नेत्याचा खोचक सल्ला.
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज
'एक चापटअन् वडिलांची हत्या, आमची मानसिकता आज काय?';देशमुख कुटुंब नाराज.
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'
'शिवसैनिक पण सामना वाचत नाही, तो फक्त सकाळी पुसण्यासाठी...'.
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत
'... म्हणून मी राजकारणात', पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे व्यक्त केली खंत.
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
'...तोच जिवंत राहील', गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?.