मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अरबाज खानचे मोठे भाष्य, थेट म्हणाला, आजही आम्ही दोघे एकमेकांना

मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा ही तिच्या शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे खुलासे करताना दिसत आहे. मलायका अरोरा ही काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर याच्याबद्दल सांगताना दिसली. हे दोघे फिरण्यासाठी विदेशात देखील गेले होते. ज्याचे अनेक फोटो व्हायरल झाले.

मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर अरबाज खानचे मोठे भाष्य, थेट म्हणाला, आजही आम्ही दोघे एकमेकांना
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 3:36 PM

मुंबई : मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा (Malaika Arora) ही अर्जुन कपूर याच्या सोबत विदेशात फिरण्यासाठी गेली होती. तिथे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघे धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने मलायका हिच्या सोबतचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. अरबाज खान (Arbaaz Khan) याच्या सोबत 2017 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी एक चर्चा जोरदार रंगली होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे लवकरच लग्न (Marriage) बंधनात अडकणार आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाच्या चर्चांवर भाष्य करणे नेहमीच टाळताना मलायका आणि अजून हे दिसतात.

विशेष म्हणजे 18 वर्षे एकमेकांसोबत सुखी संसार केल्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अरबाज घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू असताना चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे घटस्फोटाला इतके दिवस झाले असताना देखील बऱ्याच वेळा मलायका अरोरा आणि अरबाज खान एकसोबत दिसतात.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक मुलगा असून त्याचे नाव अरहान खान आहे. बऱ्याच वेळा मलायका आणि अरबाज खान हे विमानतळावर स्पाॅट होतात. मुलाला सोडण्यासाठी हे दोघे नेहमीच येतात. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अरबाज खान हा मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य करताना दिसला.

अरबाज खान म्हणाला की, आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला मूव ऑन व्हावे लागते. आमचा एक मुलगा आहे, त्यामुळे एका चांगल्या मानसिक स्थितीमध्ये राहवे लागते आणि आम्ही नेहमी राहतो देखील. गेल्या काही वर्षांपासून आम्ही दोघे खूप जास्त मॅच्योर झालो आहोत. आम्ही एकमेकांना खूप जास्त समजून देखील घेतो.

पुढे अरबाज खान म्हणाला की, माझ्या अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या त्यांनी (मलायका) स्वीकारल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच गोष्टी मी देखील स्वीकारल्या आहेत. मलायका ही बऱ्याच गोष्टींमध्ये माझ्यापेक्षा अधिक जास्त नक्कीच मॅच्योर आहे. विशेष म्हणजे आम्ही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना अधिक समजून घेत आहोत. एक चांगली गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांना आवडतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.