‘आमच्या आईसोबत असं झाल्यामुळे….’, वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अरबाज खान अनेक वर्षांनंतर व्यक्त

अनेक वर्षांनंतर खान कुटुंबातील मोठी गोष्ट समोर; सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर कसं होतं कुटुंबातील वातावरण

'आमच्या आईसोबत असं झाल्यामुळे....', वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अरबाज खान अनेक वर्षांनंतर व्यक्त
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 11:19 AM

Arbaz Khan on salim khan second Marriage : खान कुटुंबाबाबत अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात. तर खान कुटुंबाचा मुलगा आणि अभिनेता अरबाज खान (Arbaz Khan) सध्या त्याच्या ‘द इन्विन्सिबल्स’ या शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये अरबाजने त्याच्या कुटुंबाबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ज्यामुळे अभिनेत्याचा टॉक शो तुफान चर्चेत आहे. शोमध्ये आरबाज याने वडील सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर घरात कसं वातावरण होतं याबद्दल सांगितलं आहे. अनेक वर्षांनंतर अरबाज खान याने खान कुटुंबाबद्दल सर्वांसमोर मोठा खुलासा केला आहे.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अरबाज म्हणाला, ‘वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर आम्हाला आमच्या आईसाठी प्रचंड वाईट वाटायचं. आमच्या आईला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. पण वडिलांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला. एक कुटुंब म्हणून त्यांनी आमचा स्वीकार केला, त्यानंतर कालांतराने आम्ही देखील हेलन यांनी कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकार केला.’

पुढे अरबाज म्हणाला, ‘त्यांनी देखील काही परिस्थितींचा सामना केल्यानंतर त्यांनाही वाटलं की कोणाबद्दल असं मत नोंदवायला नको. आता आम्हाला कळालं की तेव्हा अनेक तक्रारी आम्ही वडिलांकडे केल्या. त्यामुळे आता असं वाटतं कोणाबद्दल आपलं मत नोंदवायला नको.. ‘ (arbaaz khan brother)

हे सुद्धा वाचा

कुटुंबाबद्दल अरबाज म्हणाला, ‘आज कोणताही श्रीमंत परिवार एकमेकांसोबत आनंदी राहू शकत नाही. पण आमचा कुटुंब मोठं आहे, जिथे प्रत्येक जण आनंदाने राहतो. ज्याठिकाणी दुसऱ्या आईला देखील तितकाच सन्मान आणि प्रेम दिलं जातं. या गोष्टी पैश्यांनी विकत घेता येत नाही, ज्याठिकाणी फक्त प्रेम आणि आदर आहे, त्याच ठिकाणी मोठं कुटुंब कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहू शकतं.’

पुढे अरबाज शोबद्दल म्हणाला, ‘हा शो अशा लोकांसाठी जे असा विचार करतात की, यशस्वी व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. शिवाय शोच्या माध्यामातून फिल्मी आयुष्यात होणारे संघर्ष सर्वांसमोर यावे.. या प्रयत्नात मी आहे.’ असं देखील अरबाज खान याठिकाणी म्हणाला. (arbaaz khan son)

अरबाज याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याच्या आयुष्यात देखील अनेक चढ-उतार आले. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. मलायका अभिनेता अर्जुन खान याला डेट करत आहे तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रिया (georgia arbaaz khan) हिला डेट करत आहे. (arbaaz khan 2nd wife)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.