‘मला आणि माझ्या वडिलांना मारण्यासाठी…’, प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर निशाणा

Bollywood | प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर निशाणा, म्हणाली, 'व्हिडीओमध्ये तुम्ही जे पाहिलं ते...', काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि तिच्या वडिलांवर झाला होता हल्ला.. आता अभिनेत्रीने केलेले विधान धक्कादायक... सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...

'मला आणि माझ्या वडिलांना मारण्यासाठी...', प्रसिद्ध अभिनेत्रीने साधला काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 8:20 AM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. ज्या अभिनेत्रीने काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर निशाणा साधला आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्री अर्चना गौतम आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना गौतम हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. अर्चना हिने २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, परंतु उत्तर प्रदेश काँग्रेसने अभिनेत्रीला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.

एवढंच नाही तर, काही दिवसांपूर्वी अर्चना वडिलांसोबत काँग्रेस कार्यालयात पोहोचली होती. जेव्हा अनेक महिलांनी अर्चना आणि तिच्या वडिलांना मारहाण केली. तेव्हा अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पण आता अर्चना हिने एक व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘मी दिल्लीत होती, तेव्हा प्रियांका गांधी यांना भेटावं असा विचार केला. मी माझ्या वडिलांसोबत आणि ड्रायव्हरसोबत काँग्रेस कार्यालयात पोहोचली होती. पण मला कार्यालयात जाण्याची परवानगी मिळाली नाही. मी एक दिवस अगोदर पीएला कळवलं होतं आणि त्यांनी एक योजना आखली आणि माझ्यावर हल्ला केला.’

पुढे अभिनेता म्हणाली, ‘व्हिडीओमध्ये तुम्ही जे पाहिलं ते काहीच नाही. जेव्हा हल्ला झाला तेव्हा माझा पक्ष कुठे होता? ते माझ्या मृत्यूची प्रतीक्षा करत होते का?’ असा प्रश्न उपस्थित करत अर्चना हिने प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र अर्चना गौतम हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

अर्चना हिचा मॉडेलिंगचा प्रवास

जेव्हा अर्चना हिने रवी-किशन शोमध्ये भाग घेतला, तेव्हा अर्चना हिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर यानंतर अर्चना गौतम हिने २०१८ मध्ये ‘मिस बिकिनी इंडिया’चा खिताब जिंकला. आज अर्चना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.