AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arijit Singh | औरंगाबादमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अरिजितसोबत चाहतीने केलं असं कृत्य, भडकले नेटकरी

घडलेल्या घटनेनंतरही अरिजितने ज्याप्रकारे परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि चाहत्यांचा समजावलं, त्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. 'अरिजित रागावला नाही. चाहतीने हात खेचल्यानंतरही तो त्यांना नीट समजावतोय', असं एकाने लिहिलंय.

Arijit Singh | औरंगाबादमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अरिजितसोबत चाहतीने केलं असं कृत्य, भडकले नेटकरी
Arijit SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 10:34 AM

औरंगाबाद : प्रसिद्ध गायक अरिजित सिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. औरंगाबादमध्ये अरिजितच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तो स्टेजवर परफॉर्म करत असताना एका चाहतीने पटकन त्याचा हात खेचला. या घटनेनंतर अरिजितने चाहत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरिजितच्या नम्र आणि समजूतदार स्वभावाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

सोमवारी अरिजित सिंगच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र अचानक एका मुलीने त्याचा हात खेचला. त्यावेळी अरिजितलाही आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये अरिजित म्हणतो, “तुम्हाला हे समजलं पाहिजे. तुम्ही माझं ऐका, बोलू नका. तुम्ही परफॉर्मन्सची मजा घेत आहात, ते मान्य आहे. पण जर मी परफॉर्मच करू शकलो नाही तर तुम्ही त्याची मजा कशी घेणार? तुम्ही सर्वजण मोठे आणि समजूतदार आहात. माझा हात का खेचला? माझा हात अजूनही थरथर कापतोय. मी इथून जाऊ का?”

हे सुद्धा वाचा

आणखी एका चाहत्याने अरिजित सिंगच्या हाताचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘एक कलाकार तुमच्यासाठी तासनतास न थांबता परफॉर्म करतो. एखादा शो पार पाडण्यामागे अनेक जणांची मेहनत असते. पण चाहत्यांकडून अशी वागणूक अपेक्षित नाही. कृपया कलाकारांचा आदर करा. म्युझिकचा आनंदचा घ्या पण नम्रतेने वागा.’

घडलेल्या घटनेनंतरही अरिजितने ज्याप्रकारे परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि चाहत्यांचा समजावलं, त्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. ‘अरिजित रागावला नाही. चाहतीने हात खेचल्यानंतरही तो त्यांना नीट समजावतोय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे खूप दुर्दैवी आहे’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अशा चाहत्यांविरोधात कारवाई केली पाहिजे’ अशीही मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

अरिजित सिंगने बॉलिवूडमधली एकापेक्षा एक दमदार गाणी गायली आहेत. केसरिया, अपना बना ले, झुमे जो पठाण यांसारखी त्याची आताची गाणी लोकप्रिय आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याचे देशभरात शोज सुरू आहेत. दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकाता याठिकाणी त्याने आतापर्यंत परफॉर्म केलं आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.