Arjun Kapoor | मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरचं उत्तर; म्हणाला “आमचं खासगी आयुष्य हे..”

अर्जुन आणि मलायका लवकरच आई-बाबा बनणार आहेत, अशा आशयाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. इतकंच नव्हे तर लंडनच्या ट्रिपदरम्यान दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना याविषयीची माहिती दिली, असंही त्यात म्हटलं होतं.

Arjun Kapoor | मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरचं उत्तर; म्हणाला आमचं खासगी आयुष्य हे..
Arjun Kapoor, Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 10:52 AM

मुंबई : गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री मलायका अरोरा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर उत्तर देत पूर्णविराम दिला होता. मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांमुळे त्यावेळी अर्जुन भलताच संतापला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन पुन्हा एकदा अशा चर्चांवर व्यक्त झाला आहे. त्या चर्चांचा त्याच्यावर परिणाम काय झाला, याविषयीही त्याने सांगितलं आहे. अर्जुन आणि मलायका गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये या दोघांनी आपलं रिलेशनशिप ‘ऑफिशिअल’ केलं होतं. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघं एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.

‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “नकारात्मकता ही अत्यंत सोप्या पद्धतीने पसरवली जाऊ शकते. त्यामुळे लोकांचं लक्ष फार लवकर वेधलं जातं. अशा गोष्टींकडे लोक खेचले जातात, म्हणूनच या अफवा लवकर पसरतात. आम्ही अभिनेते आहोत, पण आमचं खासगी आयुष्य हे नेहमीच खासगी नसतं. अभिनयक्षेत्रात असल्याने काही प्रमाणात तुम्हाला अशा गोष्टी खपवून घ्यावा लागतात.”

हे सुद्धा वाचा

“अशा वृत्तांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख नसतो पण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही माध्यमांवर अवलंबून असतो. पण आम्हीसुद्धा माणूसच आहोत याची तुम्ही किमान तरी दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आमच्याबद्दल खूप महत्त्वाचं काही लिहिताना किमान एकदा तरी आमच्याकडून सत्यता तपासून घ्या. किमान एवढं तरी करा. तुम्ही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत, त्याबद्दल अंदाज वर्तवू नये. एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असणारी गोष्ट तुम्ही इतक्या सहजरित्या पसरवू नये”, असं तो पुढे म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायकाच्या प्रेग्नंसीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत अर्जुनने लिहिलं होतं, “तुम्ही सर्वांत खालची पातळी गाठली आहे आणि ते सुद्धा अत्यंत अनौपचारिक, असंवेदनशील आणि अनैतिक पद्धतीने तुम्ही ही बातमी दिली. हा पत्रकार सतत अशा बातम्या लिहितो आणि आम्ही फेक गॉसिप आर्टिकल्सकडे दुर्लक्ष करतो म्हणून त्याचं निभावून जातं. पण आता पुरे झालं.”

‘आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका’, असा थेट इशारा अर्जुनने या पोस्टद्वारे दिला होता. अर्जुन आणि मलायका लवकरच आई-बाबा बनणार आहेत, अशा आशयाचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. इतकंच नव्हे तर लंडनच्या ट्रिपदरम्यान दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना याविषयीची माहिती दिली, असंही त्यात म्हटलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.