Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Kapoor | बॉयफ्रेंडचा सेमी न्यूड फोटो पोस्ट केल्याने मलायका ट्रोल; टीकाकारांना अर्जुनने दिलं उत्तर

अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या दोघांच्या वयातील अंतरामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली तर कधी टीका केली. आपल्या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना मलायका ट्रोलर्सना उपरोधिक उत्तर दिलं होतं.

Arjun Kapoor | बॉयफ्रेंडचा सेमी न्यूड फोटो पोस्ट केल्याने मलायका ट्रोल; टीकाकारांना अर्जुनने दिलं उत्तर
Arjun Kapoor, Malaika AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 12:13 PM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचा बोल्ड फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरला. मलायकाने अर्जुनचा सेमी-न्यूड फोटो पोस्ट केला होता. या फोटोसोबतच मलायकाने if you know you know असा हॅशटॅग वापरला होता, ज्यावरून तिने अर्जुनसोबतच्या खासगी क्षणांचा उल्लेख केल्याचं स्पष्ट होतंय. सोशल मीडियावर अशा पद्धतीने अत्यंत खासगी फोटो पोस्ट करणं नेटकऱ्यांना अजिबात पसंत पडलं नाही. अनेकांनी त्यावरून मलायकावर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकांनंतर आता अर्जुनच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

अर्जुनने त्याच्या पहिल्या पोस्टमध्ये मलायकाने शेअर केलेला फोटो रिपोस्ट केला आहे आणि त्यावर हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने एक मेसेज शेअर केला आहे. ‘लक्ष वेधण्याऐवजी शांतीचा पर्याय निवडा. मौन बाळगून स्वत:च्या आयुष्यात पुढे जा’, अशा आशयाचा मेसेज त्याने लिहिला आहे. मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये दोघांनी सोशल मीडियावर रिलेशनशिपला ‘ऑफिशियल’ केलं होतं.

अर्जुन कपूरची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

मलायकावर टीकेचा भडीमार

अर्जुनचा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांकडून मलायकावर जोरदार टीका झाली. ‘प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास मला त्या दोघांमधील वयाच्या अंतराने फरक पडत नाही. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेमाची गरज असते. पण मलायका ही एका किशोरवयीन मुलाची आई आणि ती सोशल मीडियावर अशी वागतेय हे पाहून वाईट वाटतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘किमान मुलाचा तरी विचार कर. त्याच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्याला किती ट्रोल केलं जाईल, याचा जरासुद्धा विचार आला नाही का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. ‘सोशल मीडियावर असे फोटो का पोस्ट करावेत’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मलायकाने 2017 मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना 20 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलासाठी या दोघांना नेहमीच एकत्र आल्याचं पाहिलं गेलं. अरहान अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतोय. विमानतळावर त्याला सोडायला जाताना किंवा तो परतल्यावर त्याला आणायला जाताना नेहमीच मलायका आणि अरबाजला एकत्र पाहिलं जातं.

अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायकाला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या दोघांच्या वयातील अंतरामुळे नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली तर कधी टीका केली. आपल्या शोमध्ये स्टँडअप कॉमेडी करताना मलायका ट्रोलर्सना उपरोधिक उत्तर दिलं होतं. “दुर्दैवाने मी फक्त वयाने मोठी नाही तर माझ्यापेक्षा छोट्या व्यक्तीला डेट करतेय. माझ्यात हिंमत आहे. मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय, बरोबर बोलली ना? मी सर्वांना सांगू इच्छिते की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीये”, असं ती म्हणाली होती.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.