Malaika Arora | अर्जुन कपूरचे मलायका अरोरासोबत ब्रेकअप? फोटो शेअर करत अभिनेत्याने सांगितल्या भावना

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या अफवा सोशल मीडियावर घर करत असतानाच. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वाचीच बोलती बंद केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुन कपूरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Malaika Arora | अर्जुन कपूरचे मलायका अरोरासोबत ब्रेकअप? फोटो शेअर करत अभिनेत्याने सांगितल्या भावना
फोटो शेअर करत अर्जुन कपूरने सांगितल्या भावना
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 8:07 AM

मुंबई : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे बॉलिवूडमधील (Bollywood)सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. पण सध्या हे दोघे एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहेत. ती गोष्ट म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या अफवा सोशल मीडियावर घर करत असतानाच. आता अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वाचीच बोलती बंद केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुन कपूरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे पोस्ट ?

अर्जुन कपूरने नुकताच आपल्या लेडीसोबत मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट असणाऱ्या या फोटोमध्ये दोघेही डॅपर (Dapper)लूकमध्ये दिसत आहेत.दोघे ही गॉगल घालून दोघेही आरशात पोज देताना दिसत आहेत.  अर्जुनच्या या पोस्टमुळे मलायका अरोरा आणि त्याच्या ब्रेकअपच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. या फोटो सोबतच “अफवांना जागा नाही. सर्वजण सुरक्षित रहा, लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो.” असे कॅप्शन ही अर्जुनने दिले आहे. या कॅप्शनने अर्जुनने अजूनही ते दोघे वेगळे झालेले नाहीत असे स्पष्टपणे सांगत आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

का आहे त्यांच्या ब्रेकअपची चर्चा

काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर त्याची बहीण रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता अशी बातमी समोर येत होती. मलायका अरोरा नेहमीच अर्जुनच्या कुटुंबासोबत डिनर पार्ट्यांमध्ये सहभागी होत असली तरी यावेळी ती या डिनरचा भाग बनली नाही. तेव्हापासून त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्यामुळे तो घरीच क्वारंटाईनमध्ये राहिला. आता अर्जुन पूर्णपणे बरा असून त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.  मलायका अरोरा अनेकदा मुंबईत स्पॉट केली जाते. काही दिवसांपासून ती घराबाहेर पडली नाही, त्यानंतर बातमी आली की मलायका ब्रेकअपमुळे खूप तणावात आहे आणि तिने स्वत:ला घरात आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. ती कोणाशी जास्त बोलत नाही. त्याच्या मानसिक आरोग्यासाठी त्याने स्वतःला घरात कैद केले आहे. अशा अफवा पसरल्या होत्या. पण आता मात्र त्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

संदर्भ : सोशल मीडिया पोस्ट 

संबंधित बातम्या

‘त्या गुंड सुकेशपेक्षा तुझा बॉडीगार्ड चांगला दिसतो’, व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून जॅकलिन ट्रोल

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘कॉफी’ 14 जानेवारीला प्रदर्शित होणार

viral video: अभिनेत्री रेश्मा शिंदेचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.